श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 1 ला ॥
॥ श्रीगणेशाय नम : ॥ श्रीसरस्वत्यै नम:॥ श्रीगुरूभ्यो नम: ॥ श्रीलक्ष्मीव्यंकटेश देवताभ्योनम : । श्री गणेशाय नम : ॥ नमो जी ओंकारा ॥ गणाधीशा विघ्नहरा ॥ जयजयाजी पार्वतीकुमरा । एकदंता नमो नम:॥1 ॥ अंगी शेंदुराची उटी । माळा वासुकीची कंठठ्ठ । सुवर्णमेखला विलसे कटी । पदी नुपूरे वाजती ॥2 ॥ ऐसा तु मंगलमूर्ती । अतर्य लीला अगाध किर्ती । ग्रंथारंभी द्यावी स्फू र्ती । हीच विनंती चरणाशी ॥3 ॥ तुझा आसरा घेवोनी । प्रवर्तले ग्रंथलेखनी । बुध्दिदात्या साह्य करोनी । आस पुरवावी माझी ॥4 ॥ आता वंदीते सरस्वती । जी शब्दसृष्टिची भगवती । विश्वाची जी आद्यशति । ज्ञानदायिनी केवळ ॥5 ॥ माझीया जिव्हाग्री राहोनी । वदवी गोड रसाळ वाणी । हीच प्रार्थना चरणी । वारंवार तुजलागी ॥6 ॥ कुलगुरू दत्तात्रया । त्रयमूर्ती अत्रितनया । नरसिंह सरस्वती गुरूराया । श्रीपादश्रीवभ यतिवर्या ॥7 ॥ पतिदेवा श्रीनारायणा । येऊ द्या पत्नीची करूणा । साह्य करावे भार्येला । श्रीरामगुरूचरीत्र लिहिण्यास ॥8 ॥ गुरूबंधु गुरूभगिनी यांना । करीते एकची प्रार्थना । साह्य करा स्तवनाला । आशिर्वाद देऊनिया ॥9 ॥ माता पिता सासु शुर । वडील मंडळी घरात थोर । वंदुनी सर्वा त्रिवार । माथा चरणी ठेवितसे ॥10 ॥ श्रीगजानन माझे आद्यगुरू । श्री वामन गुळवणी दीक्षागुरू । श्रीराम माझे मोक्षगुरू । शरण मी तुम्हा त्रिवार ॥11 ॥ ज्ञानदिप ऊजळण्या अंतरी । पाहिजे भतिघृत निरंतरी । गुरूकृपा वंशपरंपरी । पुर्व सुकृ ते प्राप्त होय ॥12 ॥ धन्य धन्य गुरूमाऊली । केलीस भता कृपासाऊली । मानव जन्मा येऊनी भूवरी । कृतार्थ आम्हां केलेस ॥13 ॥ तू त्रैलोयाधीश जगत्पिता । आहे तुझी अगाध सत्ता । इच्छा उपजली मम चित्ता । तव चरित्र लिहिण्याची ॥14 ॥ पुरवी गे कन्येची आस । निमित्तमात्र ठेेवूनी कन्येस । पुर्ण करावे चरित्रास । हिच प्रार्थना क्षणोक्षणी ॥15 ॥ नाही वाड् र् मय अभ्यास । कैसे करावे शब्दरचनेस । व्याकरणाचा नसे लवलेश । नाही अध्यात्म अभ्यास ॥16 ॥ तव वरद हस्त असता शिरी । काय उणे या भूवरी । धन्य धन्य गुरूमाऊली । माय माझी त्रिभूवनी ॥17 ॥ अथांग आहे गुरूकृपा सागर । भत उध्दरण्या या भूवर । गुरूप्रकटती अवनीवर । मानवस्वरूप निरंतर कृपामृत पाजिती ॥18 ॥ गुरूच आम्हा आधारू । तरूनी जाण्या भवसागरू । भवनौकेचा वल्हरू । नेई आम्हा पैलतीरी ॥19 ॥ गुरूचरणींचे दिव्य रज । भाळी लावावे प्रतिदिन । जेणे नाश भवपातक । होत त्वरीत निश्चये ॥20 ॥ श्रीराम यतीवर कल्पतरू । भक्तां शांतवी निरंतरू । कृपाछाया भक्तावरू । आश्रय देती नि र् संशय ॥ 21 ॥ गुरूविणा उध्दार । कोण करील या भूवर । कलियुगी गुरू अवनीवर । गुप्तरूपे नांदती ॥22 ॥ थोर या नरजन्माची महती । भक्तिमार्गे मोक्षगती । कलीयुगी सहज गती । जीवन मुक्ति मानवा ॥23 ॥ अवघड आहे अध्यात्मपथ । खाच खळगे अगणित । गुरूकृपेने क्रमण्यास । सुलभ होय मार्ग तो ॥ 24 ॥ श्री गुरूचरणांच्या ध्यानात । खंड नसावा अहोरात्र । नामस्मरण अखंडित । भक्तिभावे करावे ॥ 25 ॥ नको सायास यातायाती । प्रपंच साधनी सहज गती । गुरूकृपेने जीवनमुक्ती । मानवा प्राप्त होईल हो ॥ 26 ॥ चित्त असावे निर्मळ । वाणी असावी प्रेमळ । दिव्यह्ष्टीने भूमंडळ । गुरूस्वरूपी पहावे ॥ 27 ॥ गुरूचरणीचे ध्यान तेची असावे संध्या स्नान । गुरूचरणाची माती तेचि मानावी भागिरथी । सर्व तीर्थांची पवित्र गती । तेथेची जाणावी सदोदीत ॥28 ॥ श्रीराम पदकमली । अर्पिली माझी देहांजली । भक्ति निर्झर सदा ठेवी । गुरूराया अखंडीत ॥ 29 ॥ नरजन्म अवघा गेला वाया । प्रपंच मार्गी राहुनिया । आता येऊ द्यावी दया । परम कृपाळू गुरूराया ॥ 30 ॥ अध्यात्म ज्ञान प्राप्त होण्या । साह्य करावे कन्येला । नाही आधार तुजविणा । त्रिभुवनपालका रामराया ॥ 31 ॥ श्रीरामरायागुरूदत्ता । अवधूत दिगंबरा भक्तत्राता । चतुर्थ अवताराची कथा । वर्णण्या साहाय्य करावे ॥32 ॥ नाही ज्ञान नाही मती । गहन आहे कर्मगती । परी गुरूकृपे निश्चिती । जीवनमुक्ती होय प्राप्त ॥ 33 ॥ गुरूपुष्य योगावरी । आज्ञा घेऊनी निर्धारी । प्रारंभ केला खरोखरी । आनि प्रतिपदेला ॥ 34 ॥ वडिल बंधू श्रीरामांचे । असती मुंबानगरी साचे । साहाय्य घ्यावे त्या पतिपत्नीचे । अशी आज्ञा श्रीगुरूंची । ।35 ॥ बालवीर शिक्षणसंस्थेमाझारी । कमिश्नराचे हूद्दयावरी । मुकुंदराव सहकुटूंब सहपरिवारी । आनंदसदनी नांदती ॥36 ॥ गुरूकृपा वंशपरंपरी । आहे कुळकर्णी कुळावरी । याचा विस्तार पुढील अध्यायी । वर्णन करू गुरूकृपे ॥37 ॥ ऐका श्रोते सावधान । गुरूच करतील ग्रंथकथन । निमित्त मज ठेवूनी । उपदेशितील भक्तांसी ॥38 ॥ इति श्रीरामगुरूचरित्रे प्रथमोध्याय:संपूर्ण॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |