श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 37 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।ऐका श्रोते भायवान । कलियुगी विभुति महिमान । विभुतिशब्दांचे अर्थ दोन । व्यवहारदृष्ट या होत असे ॥1॥ पूर्वी महान पूर्वकाली । शिवपार्वती ऐके वेळी । राहुनि कैलासमंदिरी। प्रश्न करी शिवसुदंरी ॥2॥ अहो शंकरा गिरीजावरा । भक्त कैवारी त्रिपूरहारा । कथावे मजसी कर्पूरगौरा । विभुतिमहात्म्य पवित्र ॥3॥ तुम्ही जगाचे अधिपती । त्रैलोक्याधीश जगती । प्रसन्न होउूनी भक्ताप्रति । अभयदान नित्य देता ॥4॥ हरी भक्तिचा भुकेला । भोळया भक्ताचा चाकर झाला । स्वत्व विसरला भक्तासवे । ऐसी ख्याती त्रिजगती ॥5॥ गुरू दत्तात्रय त्रयमुर्ति । सगुणरूप हे जगति । प्रत्यक्ष असूनी अनूभुति ।गुप्तरूपे राहताती ॥6॥ स्वामीरायांचेमंगलचरण । मंगल त्यांचे नामस्मरण । मंगल करिल भक्तजीवन । सुखशांती लाभेल ॥7॥ सदगुरूनाथांचे मानसपूजन । नित्य आनंदवी भक्तमन । भक्तगणा उपदेशुन।कृताथजीवनीकरिताती॥8॥भवसमाधीत श्रीगुरू । अविनाशीकल्पतरू । श्रीरामचंद्र सरस्वती सदगुरू । भाव मनीचा जाणीत असो ॥9॥ प्रसन्न होउनी सदाशिव । उध्दरीला वामदेव । भस्ममहात्म्य कथूनी सर्वो । तोषविले गौरीप्रति ॥10॥ भस्मविभुतिचे वर्णन । गुरूचरित्री सुपूर्ण । सरस्वतीगंगाधर करून । जनलोका कथियेले ॥11॥ कालगतीप्रमाणे ।सदगुरूनाथाकारणे । सौम्यरूपे भक्ताकारणे । गुरूरायेधरियले ॥12॥ सगुणरूपाची प्रखरता । मानवी नयन दिपती देखता । दिव्यदृष्टी नसे जगता । साक्षरूप ते पाहण्याची॥13॥ त्या पुर्णवताराची साक्षरता । अनुभवीच वर्णन करिता । आनंद हो प्रसन्नचिता थोर भाय मानवाने ॥14॥ परीमानवा भुरळ न ओळखे तो रूप निर्मळ । चंचळ मना चळवळ । निसर्गानियम जीवनाचा ॥15॥ स्वामी रामचंद्रसरस्वती। प्रत्यक्षरूपे भुवरती । भक्तासवे नांदती । कलियुगी जनकार्या ॥16॥ विभुती जगती थोर । करावया जगदोध्दार ।गुप्तरूपे अवनीवर । पवित्र कार्य करिताती ॥17॥ विभूति शब्दाचे स्पष्टिकरण । ऐका तुम्ही श्रोते सुजाण । गुरूमुखेश्रवण करून । शब्दे तेथे वर्णिते ॥18॥ रक्षा आणि विभूति । येथे भेद निश्चिती । रक्षा होतसे शरिराची । शरीरनाशिवंत देहांती ॥19॥ विभुती शब्दाचा पवित्र अर्थ । विभुति देणारे समर्थ । त्रयमुर्तिच प्रत्यक्ष ते । साक्षरूपे स्वयंभू॥20॥ ईश्वरी संकेतेकरून । सदगुरूहस्ते वितरण । त्या अंगा-यास विभुति नाम । सहाय्य करी मानवा ॥21॥अवनीवरी सदगुरूनाथ । रूप घेवूनी गुप्त । पुर्णावतारे नांदतो । यती अवधूत त्रयमुर्ति ॥22॥ त्या पूर्णअवताराचीसाक्षात अनुभविच वर्णण करीता । आनंद ही प्रसन्न चित्ता । थोर भाय मानवाचे ॥23॥ आता विभूतिचा दूसरा अर्थ।अवकारी सत्पुरूष गुरूनाथ । स्वयंचि अवतरोनी गुप्त । अवतारकार्य करिताती ॥24॥ ईश्वरीकृपेकरून । स्वामीतह आज्ञेवरून । जनहीता नित्य झटून । जगदोध्दार करिताती ॥25॥ गुरूपी= वंशपंरपरा । चालविण्या सत्वरा ।कलियुगी गुरूवरा । गुप्त राहणे भाग झाले ॥26॥ आदिमाया आदिशक्ती । तिजला ही गुरूरांयाची प्रिती । चरणसेवा नित्य करिती । अत्यानंदित होउनी ॥27॥ स्वामी नृसिंह सरस्वती । अपदेशिती रामचंद्रा प्रति । अंखडीत त्रयरात्री ।आज्ञा देती कार्याची ॥28॥ काय कथिती स्वामीसमर्थ । ऐका श्रोते सावचित्त । दु:खीकष्टी रोगग्रस्त । भनामती भूतखेत ॥29॥ भवदु:खी जे चिंताग्रस्त । भोळया भाविकांचा जाणुनी हेत । आध्यात्मिकांशी यांगाभ्यास । मार्गदर्शनकरिताती ॥30॥ शरणांगतासी रक्षावया । पुण्यात्मे उध्दरावया । समयोचित अनुग्रहावया । अवतार असे भूमीवरी॥31॥ त्रिकालज्ञ हे त्रयमुर्ति । गुप्तरूपे राहूनि यती । प्रपंचीमार्गी राहुनी । कार्यभाग साधताती ॥32॥ प्रभु रामचंद्राचाअवतार ।करावया जगदोध्दार । गुप्तरूपे अवनीवर । प्रत्यक्ष रूपे नांदती ॥33॥ जरी रूप हे गुप्त । परी साक्षत्वाची येप्रचित । सर्वाठयी सदगुरूनाथ । रक्षित असे शरणांगता ॥34॥ गुरूमाये रामराया । अनन्यशरण तुझिये पाया । रक्षीरक्षी सदया । तव चरणी स्थिर करी ॥35॥ भूतपिशाश्चादिक । अतृप्त आत्मे अनेक । प्रत्येकाचे प्राक्तनाप्रमाणे । मुक्ती मिळे विभुतीने ॥36॥ गुरूदेव दत्तात्रेया त्रिकालाज्ञ सर्वाेव।जाणूनियाआतंरभाव । भक्तहेत पुरविती ॥37॥जे का पुण्यवान पिशाश्च । जाणुनी त्याचे पूर्वसुकृत । उध्दार तयांचा करिताती । स्वये स्वंयभू त्रयमुर्ति ॥38॥ विभूतिजी का प्रासादिक । अनमोल असे साक्षात । क्रमावया प्रगतीपथ । सहाय्य नित्य करितसे ॥39॥ विभुती जी कागुरूहस्ते । मिळते ज्या मानवाते । धन्य नर ते भुवरचे । सदगती तया निश्चितचि ॥40॥ अष्ट सिध्दि ज्यांच्या दासी । रात्रदिनी सेवेशी । परी तो जगन्नाथ अविनाशी । जनकल्याण झटतसे ॥41॥ म्हणूनी श्रोते सावधान । गुरूवचनीश्रध्दा =ेवून । सेवाव्रत आचरून । निश्चित करावी कालक्रमणा ॥42॥ इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड ।विनवी दासी अखंड ।सप्तत्रिंशा ध्याय गोड हा ॥43 ॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |