श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 39 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।ॐ नमोजी त्रैलोक्याधीशा । त्रयमुर्ति अविनाशा । पुरविण्याभक्तमनिषा । अवतरलासी भूवरी ॥1॥ गुप्तरूपाने सदगुरू । मानवप्राण्या कल्पतरू । मनकामना साकारू । नित्यनिरंतरी करीत असे ॥2॥ नवविधा भक्ती माझाी । निष्काम भक्ती कैशी । करावी हो गुरूमुर्ति । मार्ग दावी बालका॥3॥ तूच माय मायाळू । करी लेकराचा सांभाळू । अतिकनवाळू दयाळू गुरूमाउलीत्रयमुति ॥4॥ भावभक्तीचाजिव्हाळा । उपजविशी स्नेहाळा । पुरविण्या हट्ट लडिवाळा ।तूच मायमाऊली ॥5॥ माये तू ज्ञानाचा सागर । जीव हाअज्ञान ओहळ । गुरूगंगा तत्काळ । तदरूप घेई करूनी ॥6॥ तुच माझी मायबाप । तूच जाणिशी सर्व सोय । परममंगलतुझे पाय । नित्य दावी दयाळा ॥7॥ तुझे सुक्ष्म अस्तित्व । तव कृपेचा किरणस्पर्श । तत्काळ उजळवी जीवन ।जाणण्या आड अज्ञत्व ॥8॥ गुरूदेवा तुझी कृपा । भक्तजीवन अलौकीका । जवळी घेवूनी भक्तसखया । दावी नित्यमार्ग सोपा ॥9॥ भवसिंधु तरावया । चरणनौका तुझी सदया । वल्हरू तव करद्वया । शिरी असे भक्तांच्या ॥10॥भवाब्धितारक कल्पतरू । श्रीरामचंद्र सदगुरू । घेवुनिया अवतारू । जगदोध्दार नित्य करी ॥11॥ या मायावीसंसारात । अनेक संकटे येतात । भूत पिशाश्च भयानक । असूरी विद्या अगणित ॥12॥करणी कुटाळया भानामती ।जारणमारण अधोगती । अव्याहत जगती । नित्य गांजिती मानवा ॥13॥ त्याचा करावया संहार । निसर्गनियतीचाव्यवहार । नित्य संतुलन साचार । भूतलाशी चालते ॥14॥ नियतीचा व्यवहार । सदगुरू तोच जाणणार । त्याहूनी दूजाथोर नाही । श्रेष्= जगी कोणी ॥15॥ श्रीगुरूमुर्तिचा अवतार । करावया जगदोध्दार । कलियुगी साचार । गौप्यरूपेझालासे ॥16॥ कुटिल नियतीचा व्यवहार । कलियुगीचा भ्रष्टाचार । न कळे अज्ञ मानवा । आद्यंत या युगात ॥17॥आदिशक्तिचे अस्तित्व । न जाणिती आद्य सिध्दांत । विज्ञानसाहये संशोधक । मानवी जीवन अभ्यासिती ॥18॥निसर्गनियतीचा व्यापार । सुखदू:खाचा समाचार । कु=े काय घडणार । न लागे थांग किंचित ॥19॥ अतुल विधात्याचीकरणी । त्रिकालज्ञ तोची जाणी ।भूत - भविष्य वर्तमानी । गुरूपी= जागृत ॥20॥ स्वामी दत्तात्रय गुरूदेव । तुझ्यालीलेचा आढावा । न कळे गा मानवा । तुझा तुचि समर्थ ॥21॥ एका चिकित्सक तरूणाने । प्रश्न केला कुतूहलाने ।गुरूमुर्ति आनंदाने । सविधाने उत्तरती ॥22॥ प्रेरणा होउनि तयाचे मनी । धाव घेतली गुरूसदनी । अनन्यभावेनम्रवचनी।प्रार्थीयले सदगुरूशी ॥23॥ आंद्यत या काळात । असूरीविद्या प्रभावित । विज्ञानी या जनलोकात । नसेभरवसा तयावरी ॥24॥ परी विद्यमान या गृहस्थास । गूढ वाटले चित्तास । याचा करावा अभ्यास । जनलोकीसुखवावया ॥25॥ ही विद्या का शक्ति । ना कळे भेद चित्ति । याचे अवलोकन गुरूमुर्ती । सार्थ करितील स्वयेचि॥26॥ या विद्येचा वृत्तांन्त । सविस्तर कथिती गुरूदत्त । ऐका श्रोते सावचित्त । असुरी विद्येचे प्रतारण ॥27॥ याविद्येची मूळ उत्पत्ती । को=े कैसी झाली जगती । यथासांग वर्णिती । गुरूदेव स्वयंभू ॥28॥ विश्वोत्पत्तीपासून ।मानवदेहावरील प्रेम । हिंस्त्र प्राणी आणि शत्रुपासून । संरक्षण इच्छितो मानव ॥29॥ प्रथम प्राचीनकाळी । हिंस्त्रप्राणीमानवा छळी । त्यांना कराया निर्बळी । शिकला मानव ही विद्या ॥30॥ मंत्रविद्येकरून । प्रयोग करिती शक्तिमान ।सरंक्षण होण्याकारण । कार्यहीन करिती पशू ते ॥31॥ जंगली अरण्य भागात । छत्तीसगढ विभागात । मरा=वाडयाप्रत। या विद्येचा प्रचार असे ॥32॥ या विद्येचा प्रयोग । भिन्न भिन्न यथासांग । को=े को=े प्रचार । सविस्तर वर्णन कथियले॥33॥ आकस्मिक आपत्ती नैसर्गिक । पिकपाण्यावरी येत । टाळण्या त्या आपत्तीस । मंत्रविद्या उपयोगी ॥34॥ उदाहराणाकार । कथियेले वर्णन । टोळधाड म्हणुन । शत्रु असे पिकाचा ॥35॥ त्या पासुन व्हाया संरक्षण । मांत्रिकगावागणिक । मंत्रप्रयोग करून । परतवी टोळधाड ॥36॥ तैसाच गारेचा पर्जन्य । पिकाचे करी नुकसान । गारपगारीमंत्र म्हणून । परतवी त्या पर्जन्याते ॥37॥ या विद्येचा प्रयोग । दिसण्या जरी सुलभ । तरी मांत्रिकाशी कष्टप्रद । ते जगनिरळेची ॥38॥ या विद्येचे शिक्षण । योया समय त्याकारण । वार विथी कोणते स्थान । ऐकिले हे गुरूमुखतुन ॥39॥वेदश्रुती काळापासुन । अद्यवत हे आचरण । पवित्र क्रियमाण । असती काही बंधने ॥40॥ कथियेले जे श्रुतींनी ।काहीनियममानवाने।पाळावेसंरक्षणाकारणे । अघोरी विद्येपासून ॥41॥ या विद्येच्या प्रशिक्षणा । स्मशानभूमी योयजाणा । मध्यरात्रीच्या समयाला । मृतात्मे जागविती ॥42॥ प्रशिक्षणाउपयोगी । प्रसूत स्त्रीची कवटी । किंवा चिंधीचिरकोटी । तैसेच मूत्र उपयोगी ॥43॥ म्हणून प्रसूत स्त्रियेस । जी का स्त्री ॠतुस्नात । तैसीच गर्भिणी नववधुप्रत ।भया या विद्येपासुन ॥44॥ तेलकट तळीव पदार्थ । दही लिंबू आंबट । तैसेच काळे हिरवे वस्त्र । नव बालकाचे जाउळ॥45॥ भयग्रस्त या प्रयोगास । सिध्द करिती मांत्रिक । भरवसा =ेउनि सत्य । संरक्षीत असावे ॥46॥ मध्यरात्रीमाध्यान्हाकाळी । तैसेच भर सांयकाळी । अमावस्या पौर्णिमा मंगळवारी । भयानक वेळ शनिवारची ॥47॥ नदीतिरीबोर बाभूळ वृक्षातळी । चिंच महावृक्ष पिंपळी । भयानक स्मशानातरी । जाउ नये सूजन हो ॥48॥ अपरिचित स्थळीबसू नये लघुशंकेशी । तळीव पदार्थ दही भाताशी । निशी भोजनी खाउ नये ॥49॥ रात्री बारा पासून पिशाच्यांचे भ्रमण। वास्तव्या शोधती ठण । भटकू नये हया समयी ॥50॥ इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड ।एकोनचत्वारिंशा ध्याय गोड हा ॥51 ॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |