श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 42 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।आद्य गणेशा गौरीसुता । लंबोदरा एकदंता । प्रथम तुझे वंदन । सहाय्य करी चरित्रासी ॥1॥ तूंच स्वयंभू आद्यगुरू । मुह पिटाधिपती सर्वेश्वरू । गणाधीशा विश्वेश्वरू ।मूषकवाहना मोरेश्वरा ॥2॥ परममंगल तुझे नाम । परम मंगल तुझे धाम । परममंगल तुझे चरण । सिध्दि विनायकागणेशा ॥3॥ कार्यारंभी तुझे स्मरण । तुझी प्रार्थना करून । सहाय्य व्हावे म्हणून । तुज नमिते प्रथमचि ॥4॥ आताकरिते वंदना । तुजसि बा गजवदना । गुरूकृपा महत्म वर्णण्या । शब्दरचना सुचवावी ॥5॥ गुरूकृपेची थोरवी। कैसेमानवे वर्णावी । शब्दरचने - अभावी । अंत नाही लिखाण ॥6॥ कृपासागरा दयावंता । कृपाळू ब अनंता । आदि अनादिसद्गुरूनाथा । अगाध तुझा महिमा असे ॥7॥ आकं= प्राशावे नित्य । गुरू उपदेशामृत । नित्यनित्य निर्विकल्प । भावअंतरी असे ॥8॥ जगद्गुरू जगद्वंद्या । मायबाप सर्वेश्वरा ।निजभक्तातूचआधार।कल्पतरूभक्तांचा ॥9॥ गुरूरामचंद्राची लीला । वर्णन करण्यामतिला । शब्द रचण्या वाणीला । तूंच सुचवी दयाळा ॥10॥ निर्गुण जे निराकार ।परब्रम्ह सर्वेश्वर । सद्गुरू अवतार । समयोचित घेताती ॥11॥ अवतार कार्याची महति । तिन्ही लोकी जगति । अखिल ब्रम्हांडी व्याप्ती । त्रिकालज्ञ तो जाणा ॥12॥ जयजयाजी योगीराणा । योगी संभूता सगुणा । आकारा आणिले परब्रम्हा। योगमायेकरूनि ॥13॥ गुरूदेवाची प्रसन्न मुर्ति । दर्शनमात्रे पापे जळती । महापापी उध्दरती । सद्गती अंती पावती॥14॥ गुरूदेवा प्रसन्नचित्ति । देखताति आनंदवृत्ती । सारी दु:खे विलया जाती । आत्मानंद होतसे ॥15॥ आत्मस्वरूपीहोता लीन । आनंदित अंतर्मन । एकचित्ते एकभावकरून । जगदात्मा ओळखावा ॥16॥ गुरूवाक्य प्रमाण । तेचि असेमहाज्ञान । सर्वशास्त्रे पुराण । गुरू वाणीत असे ॥17॥ गुरूदेवाचे स्तवन । आनंदवी रात्रंदिन । दिनदयाळ दयाधन । नित्य तोषवी भक्ताते ॥18॥ भक्तवत्सल कृपाळू । करी दिनांचा सांभाळू । कृपाछत्र धरी शिरी । गुरूछायेत भक्त॥19॥ नित्य भोगी शांतीसुख । गुरूमाये कनवाळु । सद्गुरू भक्ता ते । आत्मानंद सदोदित ॥20॥ भक्तांचाआनंदसोहळा । तू पाहसी घननीळा । सर्वस्व देउनि वेगळा । गुप्तरूपे राहत असे ॥21॥ सुक्ष्म देहे परिभ्रमण । भक्तरक्षणाकारण । त्रिभुवन सारे हिंडून । ब्रीद आपुले चालवी ॥22॥ अनंतकोटी ब्रम्हांडनायक । जगदाधीश गुरूदत्त । तोचि सर्वसत्ताधीश । रूपे अनेक घेत असे ॥23॥ सत्ताधीश सद्गुरू । त्रैलोक्याधीश कल्पतरू । चराचराचा आधरू ।प्रतिपालक मायबाप ॥24॥ कोणत्याही स्थितिप्रति । विसर नसावा नामाशी । गुरूगूण गाण्याशी । नित्य मति देई का॥25॥ मति असावी सात्विक शुध्द । न घडावा कवणाशी द्वेष । नसावा विकल्प मनात । कोणत्याही जीवाविषयी॥26॥ परमंगल गुरूध्यान । नित्य असावे चिंतन । शुध्द असावे अंत:करण । सात्विक भाव जीवेभावे ॥27॥नामाचा महिमा अगाध । पाषाण तरले जलात । तुकयाची गाथा गंगेत । पूर्ववत राहिली ॥28॥ ऐसा नामाचा महिमा । नाम घेत नित्यनेमा । मन प्रफुल्ल आनंदघना । हर्ष होई गुरूदेवा ॥29॥गुरूदेवाचे दास्यत्व । नि :स्वार्थपणे सदोदित ।गोडनाम मुखात । आनंदाने घ्यावे जिवा ॥30॥ जीवा रंगता नामस्मरणे । जीवभाव एकवटुनी । आत्मानंद जीवनी ।गुरूकृपेची भोगावा ॥31॥ कृपांकित होता गुरूचा । भायोदय होई जीवाचा । नित्य नव्या आनंदाचा । उपभोग घेई जीवहा ॥32॥ जन्ममरण देहाशी । अमरत्व आतम्याशी । परम - पवित्र भावाशी । जीवनमुक्ति सदैव ॥33॥ कार्य करायाउध्दाराचे । अवतार होती सत्पुरूषांचे । भिन्न भिन्न रूपे त्यांची । काळपरत्वे असताती ॥34॥ अवताराचा महिमा थोर। उतरावया भूमीभार । ईश्वर घेतो अवतार । वेळोवेळी त्वरीत हो॥35॥ गुरूरायांचे चरण । हेच आपूले मंगलधाम ।परममंगल पावन । सर्वतीर्थ गुरूचरणी ॥36॥ कृपाप्रसाद सद्गुरूंचा । भक्तावरी नित्य साचा । भक्तप्रेम ओसंडता। अमृतलहरी उसळती ॥37॥ श्रीरामचंद्र सरस्वती । औदुंबरी नित्य वसति । जगदोध्दारक कार्य करिती गुप्तरूपे राहुनि ॥38॥ गुप्त जरी दिसती नयनी । कार्य करिती प्रत्यक्षपणे । एकोभावे करूनी । दिव्यदृष्टिने पहावे ॥39॥वेळोवेळी समाधीत । होउनिया आनंदित । मार्ग दाविती भक्ताप्रति । संदेश देती गुरूदेव ॥40॥ कर्णमधुर त्या स्वराने । मन आंनदाने प्रेमाने । भक्तिभाव द्विगुणे । त्याक्षणी दरबारी ॥41॥ यापुढील कथन । ऐका चित्त देउन । अंशाावतार पूर्णावताराचे वर्णन । स्वयेचि कथिले श्रीगुरूंनी ॥42॥इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड ।द्विचत्वरिंशाा ध्याय गोड हा ॥43॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |