श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 44 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।मंगलमुर्ति मोरया । ॠध्दि - सिध्दि तुझिया पाया ।वाड:मय सेवा करावया । साहाय्य करावे गणाधीशा । ।1 । । दुर्वांकुर तुजसी प्रिय । शमवावया सर्व दाह । तव कृपे नष्ट होई । दुर्वासनेचे समूळ विष । ।2 । । आदिमाया योगिनी । शिव-शक्ति कुमुदिनी । नित्य अलिप्त राहुनी । गुप्तरूपे कार्य करी । ।3 । । साधनेचा आधारस्तंभ । साशंकांचा करी प्रबंध । सर्वाभूती ईश्वरभाव । मार्गदर्शन सर्वांशी । ।4 । । सद्भावनेचाअभाव । तयावरी कृपा प्रभाव । करी माय नित्य ती । मूळपी= निवासिनी । ।5 । । मूळशक्ति शांभवी । शिवाहूनी काहीवेगळी । सद्गुरूरूप आगळी । जिवाशिवाशी शाश्वत ती । ।6 । । जरी का धरली मानवकाया । ती जगदंबा शिवजाया ।आनंदमयी तिची छाया । नित्य असे भक्तावरी । ।7 । । जरी का धरिला मानवदेह । कलियुगी नि:संदेह । तीन जन्माचीतपसाधना । प्रत्याया येई ये जन्मा । ।8 । । तियेच्चा माध्यमातुनी जाणा । गुरू उपदेशिती भक्तजना ।गुरूमुखातून अमृतवचना । जे का करिती भक्तश्रवणी । ।9 । । भक्तिमार्गातील वाटचाल । अडथळे होई दूर । सुलभ सुखकर सुंदरसाधकांची साधना । ।10 । । साधनातील आनंद । क्रमाक्रमाने सुखकंद । सद्गुरू सच्चितानंद । गुप्तरूपे देत असे । ।11 । ।आनंदमयी दिव्यशक्ति । देखता नयने दिपती । सद्गुरूच देतसे दिव्यदृष्टी । अदभुत सोहळा पाहण्या । ।12 । । उपासनेप्रमाणे । शक्तिदेवता जागणे । ज्ञाुंच्डलिनी उर्ध्व होणे । सद्गुरूचीच कृपा ती । ।13 । । होता गुरूकृपा । आत्मरूप तो आनंद देखा । सच्चीतानंद सुखा । पार नाही अपार ते । ।14 । । नको नको ते स्वर्गसुख । श्रीमुख पाहावे सन्मुख । सेवेस पाहिजे चरणनित्य । दास्य भक्तिकारणे । ।15 । । श्रीरामाचे सन्मुख । असे नित्य हनुमंत । भक्तासाठठ्ठ भगवंत । चाकर होई नाथाघरी । ।16 । । जनाबाईसवे पांडुरंगे । दळण दळीले स्वअंगे । गुरेढोरे चोख्यासंगे । स्वये हाकलीले वि=्=ले । ।17 । । तसेच हे त्रयमुर्ति । अत्रि अनुसूयेचे ओटी । भाव - भक्तिच्या पोटी । जन्मले जगदोध्दाराकारणे । ।18 । । सत्व पाहिले सतीचे ।अमृतपान कराया मातेचे । मातृीाावे अनुसूयेचे । तृप्त केले नेत्रे ते । ।19 । । दिव्यदृष्टि देऊनि । ओळख पटविली त्रयमुर्तीनी । ब्रम्हा ज्र् विष्णु महेशांनी । बालरूप घेतले । ।20 । ।शिवब्रम्ह जे दोन्ही ।तपास गेले निघोनी । विष्णुमात्र आश्रमी । सेवेस राहिलेसाविीसध । ।21 । ।सूयोदयापासून ।अखंडकरोनीभ्रमण ।जगदोध्दाराकारणे ।तपाचरणकरिताती । ।22 । । सायंकाळी आश्रमी । माते साविीसध राहुनी । बोध सांगली स्वमुखानी । दत्त प्रबोध ग्रंथ तो । ।23 । ।तोचि तो सुबोध ग्रंथ । स्वमुखे श्रीरामचंद्र ।संदेशरूपे भक्ता सांग । नित्य उपदेश करिताती । ।24 । । भेद न मानावा तयात । एकच रूप तेसाक्षत । याची साक्ष सदोदित । भक्ता नित्य येत असे । ।25 । । तोचि हा योगीराणा । कलियुगी प्रकट जाणा । दुजाभाव अंत:करणा । न आणावा सुज्ञ हो । ।26 । ।ते अखंड जनकल्याण । ब्रीद आपुले जाणून । कार्यकरिती यागीराणा । श्रीरामचंद्र सरस्वती । ।27 । । थोर थोर साधुसंत । राष्टीय पंडित त्रिकालाबाधित । श्री कवीश्वर श्री गुरूदत्त । दरबार वर्णिती सद्गरूंचा । ।28 । । आनंद पावले त्यांचे मन । जो का गुरू दरबार पाहून । उपभोगिता आनंदघन । प्रसवीसचित्त पावले । ।29 । । आम्हा आानी जीवाला । बोध तयांनी सांगितला । नको भा्रंती जीवाला । साक्षरूप मुर्ति ही । ।30 । । अवतार दत्तात्रयाचा । उतरावया भार भूमिचा । कलियुगी गुप्तरूपाचा । फेरा नित्य ब्रम्ह मुहुर्ती । ।31 । । आर्तस्वरेभक्तजन । जे का आळविती गुरूकारण । काळवेळाचे नाही बंधन । त्वरीत धावती गुरू तेथे । ।32 । । अनेक संकट काळी । रक्षण करोनी वेळोवेळी । नित्य भक्ता सांभाळी । राम गुरूमाऊली । ।33 । । स्मर्तृगामी देवत आपले । नित्य इथे राहिले । कुळकर्णी कुळा उध्दरीले । रामचंद्र प्रभूने । ।34 । । नित्य करिती गुरूकथन । भाव शुध्द अंत:करण । नित्य इथे राहिलेनामचिंतन । देहशुध्दीकारणे । ।35 । । देहशुध्दी शुध्दबध्द । तदनंतर आत्मशुध्द । नित्य येईल प्रचित । आध्यात्मसुखाचीवेळोवेळा । ।36 । । हे मानावे प्रमाणवचन । त्रिकालाबाधित सत्य जाणा । गुरूमुखातील अमृतवचन । जन्मोजन्मी ध्यानीधरा । ।37 । । चुकवावया जन्ममृत्युचा फेरा ।चरणी श्रध्दा =ेवी नरा । दुर्वासनेला थारा । नको देऊ अंतरी । ।38 । ।कलियुगी नामसाधन । उपदेशती भक्तजना । श्रीरामचंद्र योगीराणा । नाम अवतार कलियुगी । ।39 । । यापुढील अध्यायी । गुरूवाणी अमृतमयी । श्रवण करा आनंदमयी । सद्भावीक सृजन हो । ।40 । । इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड ।चतु:चत्वारिंशा । ध्याय गोड हा । ।43 । ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |