श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 47 वा ॥
। । श्रीगणेशाय नम : । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरूभ्यो नम: । जयजयाजी मंगलमया । आद्यगुरू गणराया । सर्व शत्ति/चे मुळ तू । सहाय्य द्यावे ग्रंथासी । । 1 । । नामाचा जेथे गजर । तेथे नांदतो ईश्वर । प्रत्यक्ष प्रकटे गुरूवर । स्मर्तुगामी दत्तात्रय । । 2 । । जेथे कल्पवृक्ष सेवा । तिथेच सद्गुरू पहावा । औंदुबराची शीतल छाया । तेच गुरूचे नित्य स्थान । । 3 । । म्हणुनी कलीयुगी नरा । श्रीचरणी आश्रय धरा । दत्तरूप अवतारा । नित्यचिंतनी =ेवावे । । 4 । । संगमी करिती प्रात:स्नान । काशीमाजी संध्यावंदन । कोल्हापुरी भिक्षा करून । निद्रा करिती माहुरगडी । । 5 । । अनन्यभावे शरण जाता । अनुपम येते भाग्यता । त्या अपूर्व अशा आनंदा । काय वर्णावे वैखरीने । । 6 । । साधनेचा क्रम । प्रत्येकदिनी वाढवुन । गुरू करिती क्रियाशील । दिव्यशत्ति/ देताती । । 7 । । पूर्वसुकृतानुसार । अनुभव येत असे साच । साधकास आत्मानंद । प्रदान करिती गुरूराज । । 8 । । क्षणोक्षणी आनंदघन । मोद देताती भत्त/ास । कल्पनातीत कृपा करून । सत्स्वरूप दाखविती । । 9 । । कृपा सद्गुरूची आगळी । भत्त/ा नित्य सांभाळी । लडिवाळे कुरवाळी । नित्य माऊली सविीसध । । 10 । । सद्गुरू आगमनाची खूण । मंद सुगंध येतसे दरवळुन । प्रकटताचि आनंदघन । भत्त/ नाचू लागतो । । 11 । । मार्ग असे जो येण्याचा । त्यावर सुवासिक अत्तराचा । सडा श्ािंपती केशराचा । सेवक सारे सद्गुरूचे । । 12 । । स्वारी चाले तयावरून । मंदस्मित सुहास्यवदन । भत्त/ा देउन कृपाप्रसाद । तोषाविती भत्त/जना । । 13 । । हे वचन ना असत्य । नित्य येतसे प्रचित । स्मर्तृगामी हे दैवत । त्रिमुर्ति दत्तात्रय । । 14 । । अंतरी असता शुध्दभाव । आर्तस्वरे हाक मारीत । तेथे धावती गुरूदेव । नित्य अनुभव हाचि खरा । । 15 । । गुरूदेव रामचंद्र । सतिानंद योगींद्र । शरदातील पूर्णचंद्र । अमृतप्रभा शीतल । । 16 । । पूर्णचंद्र शीतलकिरणे । कोमल कृपाकिरणे । भत्त/ावरी अर्पणे । हेच कार्य सद्गुरूचे । । 17 । । भत्त/ासाठठ्ठ गुरूराज । अहोरात्र श्रमतात । वाटे देह ओवाळून । टाकावा हो गुरूचरणी । । 18 । । असंख्य भत्त/ असती । भिवीस भिवीस मार्ग आचरती । कोणी तपाचरणी बैसती । अनुष्ठन काही करिताती । । 19 । । कोणी रमती गायनी भजनी । कोणी प्रवचन किर्तनी । नित्य नामस्मरणी रंगती । ऐसे प्रकार अनेक । । 20 । । या सर्वांची मन:कामना । सदैव पुरवि गुरूच जाणा । गुरूकृपेच्या खुना अनुभवेच सांगती । ।21 । । ।भत्त/ रथी बैसती । सद्गुरूच होवूनि सारथी । कैवल्य धामाप्रति । भत्त/ा नेताती सद्गुरू । । 22 । । कैवल्यमुत्ति/धाम । असे गुरू चरणकमळ । भृंग होउन तन्मय । कमलचरणी नित्य रहा । । 23 । । सतिानंदाचे सोहळे । दिपती नयन आगळे । स्वतेज असे हो वेगळे । गुरूकृपेचे जाणा हो । ।24 । । भतवत्सल रामचंद्र ।शांतमुद्रा प्रसवीसचित्त । अमृतवचने तोषवित ।मार्गदर्शन करीताती । ।25 । । अनमोल ते वचन । तेचि भत्त/ा मार्गदर्शन । साधकाशी साधन । आत्मबोध व्हावया । । 26 । । त्रयमुर्ति अत्रिसुता । तुचि सत्यसंकल्पाचा दाता । अथांग तुझी कार्यसरीता । शांत वाहे कलियुगी । ।27 । । तृषार्त आत्मे जे का । आनंद पावती देखा । प्राशन करूनी कृपामृता । कृतार्थ होती जिवनी । ।28 । । जयजय सद्गुरूनाथा । आदिअनादि अनंता । सर्वमयी तुझी सत्ता । भ्रमण तुझे त्रैलोयी । । 29 । । शरणांगतीचा पंथ धरावा । नम्रभाव मनी असावा । क्रोध अहंकार मी पणा । थारा न द्यावा कदापी । । 30 । । व्हावया ज्ञानसंपवीस । मुखे करावे नामचिंतन । सद्गुरूस जाउन शरण । समर्पण वृत्ती असावी । । 31 । । इति श्रीरामगुरूचरित्र । परमपावन पवित्र । दासी विनवी अखंडित । सत्पचत्वारिंशो । ध्याय गोड हा । ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |