श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 48 वा ॥
॥ श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।विश्वपति मुरलीधरा । धरणीधरा गरूडेश्वरा । धाव पाव सखया । सहाय्य करी सत्वरी । ।1 । । द्रौपदीचा धांवा ऐकता । धावत येशी रूख्मिणीकांता । रक्षिसी तू पांडवकांता ।संकट समयी पांडवांच्या । ।2 । । तैसेचि आता घन:शामा । शामसुंदरा मुरलीधरा । धाव पाव रे गोपाळा । भक्तावरी कृपाकरी । ।3 । । नियम संध्यावंदनाचा । साधका साधनाचा । गुरूरायांनी हो कथिला । सद्गुरू-सदनी तो ऐका । ।4 । । बैसावेदेवासमोरी ।किंवा तुळशीसमोरी । अथवा नदीकिनारी । संध्यावंदन करावे । ।5 । । अश्वत्थ वृक्षातळी । किंवाकल्पवृक्षातळी । बैसोनि स्थिर चित्तानी । आत्मचिंतन करावे । ।6 । । आश्विनी पौर्णिमा कोजागिरी । चंद्र झळकेमध्यरात्री । शीतल चांदणे पसरोनी । अमृतवर्षाव करीतसे । ।7 । । म्हणुन या शुभदिनी । बैसावे चंद्रप्रकाशी ।नामचिंतनकरावे । कथिले असे पुराणी । ।8 । । शरदाच्या चांदण्यात । पौर्णिमेचा पुर्णचंद्र । अमृतवर्षाव करून । दिव्यकांति देतसे । ।9 । । प्राप्त होण्या अध्यात्मसुख । मार्ग कथिले दोन सुरेख । पिपिलीका आणि विहंग देख । गुरूस्वरूपी होण्यास । ।10 । । विहंगमार्ग गतीमान । म्हणून असे कठठ्ठण । पिपिलीका मार्ग । सरळसोपा असे हो । ।11 । । हा मार्ग असे खचित । सोपा आणि भयरहीत । विहंगमार्ग विघ्न अनेक । उंच भरारी घेतांना । ।12 । । म्हणूनी स्वये गुरूराणा । पिपिलीकामार्ग भक्तांना । सांगतसे क्रमावया । अमृतबोध तो साचा । ।13 । । पिपिलीका मार्गे जाता । निश्चित लाभतसे तन्मयता । आनंद वाटतसे चित्ता । श्री चरण प्रप्त होय । ।14 । । धाव पाव अवधूता । अनादिनाथा कृपावंता । कृपाळु तू भगवंता । अंत उगा का पाहशी । ।15 । । संतवचनी दृढ श्रध्दा । निर्विकल्प भक्तिभावा । दिव्य दृष्टिने ओळखावा अंतरीचागुरूदेव । ।16 । । त्रिकालज्ञ गुरूदेवा ।शांतिसुखाचा गुप्त =ेवा । साहय करी गुरूदेवा । श्रध्दाभक्ति वाढावी । ।17 । । जाणुनियाभक्तभाव । सदैव झटती गुरूदेव । भक्तासाठठ्ठ एकमेव । नित्य आनंद देताति । ।18 । । गुरू रामचंद्राची प्रतिमा । ह्दयी =ेवा अनुपमा । निगमागम अगम्या । सर्वाधार अनंत तो । ।19 । । अविनाशी रूप सत्य । अनंदवी मना नित्य । सतेजकांति भगवंत । कलियुगी सगुण तो । ।20 । । समर्थाचे सामर्थ्य । विराट आहे जगतात । तोचि भक्तांचा मायबाप ।सद्गुरूनाथ त्रयमूर्ति । ।21 । । गुरूदेवाचे प्रसवीसचित्त । नित्य पहावे मंगलमुख । हीच मनी असे आस । गुरूस्मरणी रहावे । ।22 । । शाश्वत ते पाहता रूप । गुरूरायाचे शांतचित्त । शाश्वत असे हेच सुख । नित्य नमावे श्रीरचणा । ।23 । । सच्चितानंद परिपूर्णा । अगाध असे तुझा महिमा । सद्गुरूनाथा दयाघना । साक्षरूपे सविीसध तु । ।24 । । सद्गुरूचेप्रसवीसचित्त । उदार असे अनंत । भक्ताशिरी वरदहस्त । काय उणे भूमीवरी । ।25 । । उतरावया भूमीभार । घेत असेअवतार । गुप्त राहुनी अवनीवर । संतसज्जना रक्षितसे । ।26 । । देहबुध्दिचे निर्मूलन । गुरूच करिती जाण । अखंड नामचिंतन । तळमळीने करावे । ।27 । । जैसी जळावीण मासोळी । न राहे वेगळी । तैसेचि नामावीण कदाकाळी । न राही रेजीवा तू । ।28 । । इति श्रीरामगुरूचरित्र ।परमपावन पवित्र । दासी विनवी अखंडीत ।अष्टचत्वारिश ।ध्याय गोड हा । ।43 । ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |