श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 49 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।ॐ नमो गणाधीशा । गौरीपुत्रा विनायका । वक्रतुंडाएकदंता । नमन माझे गजानना । ।1 । । ऐका श्रोते तुम्ही सुजन ।गुरूदेवाची लीला गहन । गिरनारयात्रा वर्णन । श्रवणीआनंद पावाल । ।2 । । कैशी नियतीची निर्मिती । भक्ता सदा मार्ग दाविती । गुरूमाध्यम निश्चित । श्रध्दाभाव असावा । ।3 । । भक्तायसाठठ्ठ त्रयमूर्ति । अहोरात्र नित्य झटती । काय अशक्य त्या जगति । साक्षरूप त्या परमात्मा । ।4 । ।जामनगरीचीस्मशानभूमी । भिती न वाटली अंत:करणी । सद्गुरूनाथासवे राहुनी । तेथील देखवा पाहिला । ।5 । । द्वारकासोमनाथ गिरनार । नर्मदातिरी गरूडेश्वर । आनंद तेथील अपार । सद्गुरूच दाविती । ।6 । । समयोचित सूचना देणे ।भक्ता सप्रेम सांगणे । स्थानमहत्म्य दर्शने । भक्ता आनंद अपार । ।7 । । सद्गुरूसवे भक्तगण । तिर्थी घडे पवित्र स्नान ।ऐशी थोर पर्वणी जाण । सद्भायाने मिळतसे । ।8 । । पुढे गेलो द्वारकापुरी । जी भगवंताची नगरी । धुलीदर्शन प्रथमदिनी । द्वारकाधीशांचे घेतले । ।9 । । शामसुंदर घननीळ । वनमाळी तो स्नेहाळ । गुरूदर्शन होताच । स्मितहास्यकरीतसे । ।10 । । हा दर्शनसोहळा । अनुभविला ते वेळा । स्थिर दृष्टिने पाहता । एकाग्र झाले हो । ।11 । । बन्सीधर प्रत्यक्ष । गुरूनाथसमवेत । सार्वभौम सत्ताधीश । राऊळामाजी हिंडला । ।12 । । आम्हा अज्ञ जना । न कळल्या भेटीच्या खुणा । ते वेळी गुरूराणा । स्वये बोलावून घेतसे । ।13 । । कटी पितांबर पिवळा । पांघरोनी निळा शेला । रत्नजडित दिव्यमाळा । मणीमुकुट शिरावरी । ।14 । । ते रूप मनोहर । प्रत्यक्ष पाहती गुरूवर । भावातीत होऊनि सत्वर । भक्तगणा पाचरिती । ।15 । । प्रत्यक्ष साविीसध्य देवाचे । उपभोगिता आनंदाचे । भरते येई आनंदाश्रूंचे । प्रेमपान्हा दाटला । ।16 । । बेटावरीजाताना । देव प्रत्यक्ष येतसे जाणा । बालरूपे बैसला राणा । गुरूसह नौकेत । ।17 । । हे जाणवले प्रत्येका । परिअज्ञानीया जीवा । कैशी कळावी अघटित घटना । गुरू तल्लीन आत्मानंदी । ।18 । । तैसाचि समुद्रस्नानाचा सोहळा । शंखोदकानेअभिषेक केला । त्रयमूर्तिसह सर्वाना । लाभ झाला स्नानाचा । ।19 । । शंखोदकाचे महात्म्य । स्वयेचि कथिती सद्गुरूनाथ । गुरूवारी भक्तगणास । अमृतमय वाणीने । ।20 । । शंखोदकाची पवित्रता । तीव्रता आणि जलदता । दृष्टबुध्दि दुर्वासनेचा । भंग करी क्षणात । ।21 । । शुध्दतेचा प्रवेश । अशुध्दतेचा नाश । उ=ती शीघ्र रोमांच । मना वाटे प्रसवीस । ।22 । । दुसरेदिनी प्रात:काळी । प्रवासा निघली मंडळी । निसर्गरम्य शोभा सगळी । सुष्टीदेवता न्याहाळीत । ।23 । । प्रभासपट्टण क्षेत्रास । त्रिवेणी संगम स्नानास । शिवालयी दर्शनास । मंडळी निघली गुरूसवे । ।24 । । हिरण्यकपिला सरस्वती ।त्रिवेणीसंगम प्रवाहगती । दोन नद्यांच्या संगमी । तिसरी असे गुप्तरूपे । ।25 । । भगवान श्रीकृष्ण मुक्तिधाम । श्रीहरीचेअंतिमस्थान । पिंपळ वृक्ष असून । गीतामंदिर समोर । ।26 । । लक्ष्मीनारायणाच्या भिंतीवर श्रीकृष्ण मुक्तिधाम । श्रीहरीचेकोरले असती मनोहर । देखता आनंद वाटतसे । ।27 । । भालक तीर्थाजवळी । श्रीकृष्ण मुर्ति पाहिली । देखता नयनेदिपली । पाहुनी ते शांतरूप । यापुढील यात्रावर्णन । परिसा श्रोते सावचित्त । विनवी दासी अखंड एकोनपंचाशत्तमो ।ध्यागोड हा ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |