श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 50 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।ॐ नमो गणाधीशा ।ओंकाररूपा विश्वेश्वरा । श्री अवधूतादिगंबरा । पार्वतीपते महादेवा । नमितसे सद्भावे ॥1॥ भालकातीर्थाजवळी । श्रीकृष्णमूर्ति साजिरी । नयनमनोहर ती मूर्ति । पाहुनी मन संतोषले ॥2॥ भालकतीर्थ पवित्र । भगतंताच्चा पायास । लागला असे बाण । व्याधाने जो सोडिला ॥3॥ तेथे असे एक तीर्थ । जलधार उफाळत । कारंजेच भासत । अतिपवित्र तिर्थ ते ॥4॥ स्थान पवित्र पाहून।पूढिलप्रवासासवजण।दिगंबराच्या गजरात । मार्ग क्रमू लागले ॥5॥ सोमनाथ विश्वेश्वराचे ।भव्यदिव्य मंदिराचे । दर्शन घडता पवित्रतेचे । मन होय प्रसवीस ॥6॥ पूजासाहित्यबेलफुले।सुहासिनींनी दीप उजळले । सुवर्णरौप्यबिल्वदळे । मनोभावे अर्पिलेली । सोमनाथे स्विकारली । पुन्हा नाही दिसली । मन गेले भाराउनी ॥9॥ पूर्ण झाल्याप्रदक्षिणा । भक्त बैसले ध्याना । मंगल अशा पवित्र स्थाना । ध्यान लागले सहजचि ॥10॥ गुरूसवे सर्वजण । त्वरीत निघाले तेथून । महाद्वारी समुद्रदर्शन । घडता आनंद वाटला ॥11॥ परचक्रापासोनी । नित्य भिती म्हणूनी । सतीअहिल्याबाईनी । दोन पिंडी स्थापिल्या ॥12॥ ॐ नम: शिवाय म्हणताच । तैसाच प्रतिध्वनी ऐकू येत । शिवनामाचानाद घुमत । मन तल्लीन शिवरूपी ॥13॥ श्रध्दायुक्त अंत:करणे । नाम जपता मनोभावे । शरण जाता अनन्यभावे ।प्रसवीस होतो शिवभोळा ॥14॥ बोलू लागले गुरूवर । कर्णमधुर आनंदस्वर ।बहूमोल ते उद्गार । परमेश्वरा साक्ष आहेसतू ॥15॥ ज्या काही घडती घटना । त्याला साक्षी तूच साचा । चैतंन्य शक्तिच असे जाणा । ईश्वर कारणीभूत असे॥16॥ घेवून मुक्तसिंह दर्शन । निघती प्रवासालागुन ।गुरूसवे भक्तगण । जुनागडी पोहोचले ॥17॥ गिरनार पायथ्याशी । उतरलो आम्ही प्रवासी । वेळ होती सायंकाळची । दीप झाले प्रकाशीत ॥18॥ दत्तगुरूंचे करून चिंतन ।गुरूदेवाची विभूती लावून । समयसुचना घेवुन । निद्रिस्थ झाली मंडळी ॥19॥ ब्राम्हमुहूर्ती उठेन । प्रातर्विधी उरकोन। दिगंबर घोषकरून।आम्हीनिघालोगुरूसवे॥20॥प्रथमपायरी समोरी । गणेश हनुमंत दर्शनी । श्रीफल फोडुनी ।चढण्यागड आरंभ केला ॥21॥ साडे सातच्या सुमारास । नेमीनाथ अंबाईप्रत । पोहोचले गुरूनाथ । द्वारी उभे राहिले ॥22॥ श्रीअंबाईचा घेउन प्रसाद । पुढचा मार्ग क्रमीत । गोरक्षनाथ दर्शनास । मुखी जयजयकार चालला ॥23॥ मुखानेजय गिरी नारायणा । नाम आनंदाने घेत । परतीची मंडळी भेटत । समाधान देती मना ॥24॥ का=ेवाडी स्वरूपातजाणा । त्रयमुर्ति पहातांना । आनंद दाटे मना । शरीरी रांमांच येती हो ॥25॥ गुरूदत्तात्रयांचे चिंतनी । प्रार्थना वंदनकरोनी । आत्मानंद दर्शनी । सद्गुरूसमवे लाभला ॥26॥ कमंडलू तिर्थीचे करून स्नान । घेउनी अखंड धुनीचे दर्शा।तपोवृध्दमहत्माचे संकेतन । सांकेती आज्ञा घेतली ॥27॥ साडेनउच्या सुमारास । श्रीदत्तपादूकांपर्यत । काहीभक्तासमवेत । गुरूदेव पोहोचले ॥28॥ परमोच्च बिंदू शिखराचा । परिसर श्री वास्तव्याचा । पावन पादुका दत्तात्रयांच्या। स्पर्शदर्शन घेतले ॥29॥ चरणस्पर्श सचेतन । प्रेमभाव कोमलपण । श्रीदत्तपादुका पावन । साष्टांग प्रणिपात केलासे ॥30॥ पंचोपचारे पूजा करून । रूद्रघेष नैवेद्यार्पण । श्रीगुरूप्रत्यक्ष जाण । साकार झाले तया स्थानी ॥31॥ मध्यान्हीचा महाप्रसाद । अलख निरंजन वाचा त्रिवार । श्रीगुरूचे ते आवाहन । परमाच्च आनंदाचा तो क्षण ॥32॥ गुरूकृपेने त्याक्षणा । महाप्रसाद पादुकांचा । भायोदय झाला साचा । आत्मानंद वाटला ॥33॥ पादुकांना करूनी वंदन । दत्त दिगंबरनाम किर्तन । यश मुर्ति पादूका घेवून परत निघली मंडळी ॥34॥ थोडे खाली उतरून । अवतरणिकेचे करूनी वाचन। तीर्थोदक शिंपून । पुनीत केले सर्वाना ॥35॥ दत्तपादुकांची उतरण । गोरक्ष शिखराची चढण । वळणावरी मंडळी थांबुन । श्रीदत्तपादुकांकडे पाहिले ॥36॥ गडावर पादुका स्थानी । महाराज स्वयंभू उभे राहूनी । कृपाकटाक्षे न्याहाळीती। सद्गुरूनी दाखविले ॥37॥ पवित्र शक्तिचे दर्शन घेण्या । सहवास श्रींचा लाभण्या । ध्यानस्थ मंडळी बैसली तेधवा। दृष्टीसुख लाभले ॥38॥ पवित्र शक्तिचे दर्शन घेण्या । सहवास श्रींचा लाभण्या । ध्यानस्थ मंडळी बैसली तेधवा असती ये जन्मी ॥39॥ सायंकाळी मुक्कामास । मंडळी आली आनंदात । महाप्रसाद भोजन । घेउनि तृप्त जाहले ॥40॥ प्रात:काळी प्रस्थान । करूनी घेतले दर्शन । वीरपूरीरामाचे । डाकोर क्षेत्री श्रीकृष्णाचे ॥41॥ दुसरे दिनीनर्मदेतिरी ।मंडळी पोहोचली गरूडेश्वरी । श्रीवासुदेवानंद सरस्वती । तेथे जागृत असती हो ॥42॥ तेथे प्रत्यक्षस्वामींनी । यजमानरूप घेवोनी । आदरातिथ्य करूनी । तयारी केली भोजनाची ॥43॥ भोजनास खिचडी. पापड । वांया बटाटयाची भाजी रूचकर । गरम फोडणी खिचडीवर । नैवेद्य आपिलादत्तचरणी॥44॥अमृतरूचीभेजना।प्रसवीसता वातावरणा ।प्रत्यक्षस्वामीदेवांना।जलदेतांनादेखिलेसवानी॥45॥दत्तनामाच्या गजरात । मंडळीपरतली बडोद्यास । बडोद्याहून अकोल्यास । पोहचली मंडळी सुखरूप ॥46॥ भायवंत तुम्ही श्रोते आता । गुरूदेवांची गाणगापूर यात्रा । प्रसवीस चित्त होउनी । श्रवण करा हो ॥47॥इति श्रीरामगुरूचरित्र ।परमपावन पवित्र । दासी विनवी अखंडीत ।पंचाशत्तमा ।ध्याय गोड हा ॥43॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |