श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

आमच्या आजोबांचे नांव होते श्रीधरपंत. त्याचे चुलत बंधू होते रामचंद्र पंत. म्हणजे आमचे चुलत आजोबा. त्या काळात आणि आमच्या घराण्यात सख्खे चुलत असा भेदभाव कधीही केला गेला नाही क़ेला जात नाही. त्या रामचंद्र आजोबा बद्दल आमच्या आई वडिला कडून समजलेली माहिती खूपच आश्चर्य जनक आहे. रामचंद्र पंतांच्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरू झाल्या. मुली सांगून येत. रामचंद्र पंतांनी त्या गोष्टीत कधीच रस दाखविला नाही. त्यांच्या बोलण्या वागण्यात विरोधच दिसून यायचा. लग्नाचा घाट जमवून आणण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. आणि एक दिवस रामचंद्र पंत घरातून नाहीसे झाले. सगळीकडे तपास केला. जवळपासची गावे नातेवाईक़ परिचित व्यत्ती ज़वळ पासची धार्मिक स्थळे अशा अनेक ठिकाणी शोध घेतला पण रामचंद्र पंत कोठेही आढळले नाही. शेवटी ही शोध मोहिम बंद करण्यात आली. संसार चक्र चालू होते. काळ पुढे जात होता जवळजवळ चाळीस वर्षा नंतर एक दिवस पांगरीच्या हनुमान मंदिरात दाढी जटा असलेला एक साधू पुरूष आला असल्याची वार्ता गावात पसरली. आणि काय आश्चर्य ! चमत्कार म्हणा हवं तर ते साधू पुरूष रामचंद्र पंतच होते. देऊळगावला राहर्णाया कुळकर्णी कुटुंबाच्या कुलगुरूंच्या हस्ते सर्व धार्मिक सोपस्कार उरकून घेतले. घरच्या सर्वांनी रामचंद्रपंतांची भेट घेतली व त्यांना सन्मानाने घरी आणले. आता येथेच घरी राहावे. कोठेही जाऊ नये असा त्यांना आग्रह केला. पण ते राहण्यास तयार झाले नाही. त्यांनी सांगितलेली एकंदर हकिकत येणे प्रमाणे-घरून निघून गेल्यानंतर दहा बारा वर्षे त्यांनी भारत भ्रमण केले. तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या चारही धामाची यात्रा केली. या कालखंडात श्री दत्तप्रभूंच्या भक्तीने त्यांना वेड लावले. दत्त प्रभूंच्या ठायी पूर्ण एकाग्रता झाल्यावर वास्तव्यासाठी त्यांनी उमरावती जिल्(ाातील मोर्शी तालुयातील केकतपूर या गावाची निवड केली. कालांतराने तेथे एक श्री दत्तांचे मंदिर बांधले. धर्मशाळा बांधली. मोठमोठी भांडीकूंडी आणि उत्सवाच्या ह्ष्टीने लागणारे इतर साहित्य जमविले. खर्चाच्या कायम व्यवस्थेसाठी भूमि संपादन केली. या सगळया गोष्टींची व्यवस्था पाहण्यासाठी केकतपूर येथे राहणे आवश्यक होते. त्या शिवाय श्री दत्तप्रभूंची सतत-अखंड सेवा करणे शय झाले नसते. मात्र पांगरी आणि केकतपूर यामध्ये कायम संपर्क राहण्यासाठी त्यांनी आमच्या सुबी'सुभ्रदा) आत्याचे लग्न तेथील श्री त्रि्ांबकराव देशमुख 'पांडे) यांच्याशी लावून दिले. रामचंद्र पंतांचे वास्तव्य केकतपूर येथे असायचे पण पांगरी आणि घरच्या सर्वोंची आठवण त्यांना बैचेन करायची. आमची आई सौ. सरस्वती बाई हिच्यावर त्यांचा फार लोभ होता. ते आईचा फार सन्मान करायचे तिला ते मातोश्रीच म्हणत. त्यांनी केकतपूर येथेच समाधी घेतली. असे होते रामभाऊ महाराज.

त्या रामभाऊ महाराजांनी सर्व भावना भक्तीसह ज्यांच्या स्वरूपात आमच्या आईच्या पोटी जन्म घेतला ते हे आमचे श्रीरामदत्त महाराज ! श्री दत्तभक्तीचा वारसा अशा रितीने त्यांना आजोबा कडून मिळाला. त्या बीजाचा आज प्रचंड वट वृक्ष झाला आहे. आमचे श्री रामदत्त महाराज श्री दत्तरूप झाले. त्यांना भक्त गण श्री दत्तावतारच मानतात. रामभाऊंचे लौकिक ह्ष्टया शालेय शिक्षण देऊळगाव राजा चिखली अकोला नागपूर येथे झाले. पटवारीपण आणि शेती यामुळे आई वडिलांना पांगरी येथे राहावे लागायचे. माझ्या नोकरीच्या निमित्ताने आमचे चिखली अकोला येथे वास्तव्य झाले. शिक्षणासाठी म्हणुन रामभाऊ व लहान बहिणी आमच्याकडे असत. माझी पत्नी सौ. इंदिरा हिने त्यांना दीर नणंदा म्हणुन नव्हे तर स्वर्तची मुले मुली म्हणुन वागविले. त्यांना कधी आई वडिलांची आठवण येऊं दिली नाही. जास्त सहवास लाभल्याने ते सुध्दा तिला वहिनी म्हणुन नव्हे तर आईच समजु लागले. ती हे तिचे महान भाग्य समजते. आजही श्री रामदत्त महाराज तिला आईच्याच ठिकाणी मानतात. तिची भेट व्हावी म्हणुन वाट पाहत असतात. तिच्या हातचा स्वयांपक रामभाऊंना फार आवडतो.

 

मागील पान           पुढील पान

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org