श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

संतांची यात्रा   नित्य सुख दात्री भूतमात्रा   - एकनाथी भागवत. संतांच्या तीर्थयात्रा महणजे सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन व त्या योगे घडणारे लोककल्याण. तीर्थानाही पावन करण्यास, शास्त्रांनाही सच्छास्त्र बनवणयास व कर्मांना सुकर्म घडवण्यासाठीच संतांच्या या यात्रा असतात असे नारद भक्ती सूत्रात सांगितले आहे.

तीर्थी कुर्वंती तिर्थांनी, सुकर्मी कुर्वन्ती कर्माणी, सच्छास्त्री कुर्वंती शास्त्राणी    नारद भक्ती सुत्र 69

तीर्थयात्रेत सत्कर्माचे आचरण काया वाचा मने घडत असते    तीर्थ बाह्यमळू क्षाळे   कर्मे अभ्यंतर उजळे   ज्ञानेश्वरी - या प्रमाणे आंतरबाह्य शुध्दी घडून तीर्थयात्रेत घडणा-या संत सहवासात ही अधिकच शुध्द होते. यात्राभाव अंत:करणात आकार धरतो. यात्रा कस्न यात्राभाव अंतरी निर्माण झाला तर ती यात्रा. देवी भागवतात तर वर्ण केलं आहे की,   मद् भक्तायत्र निष्ठंती पादं प्रक्षालन्तिच  तत्स्थानंच महातिर्थ सुपवित्र भवेद् धृवम -  देवी भागवत.
एकदा उच्च कोटीच्या रामभक्ताजवळ, चर्चा करण्यासाठी काही विप्र मंडळी येतात. सतत नामस्मरण असल्यामुळे काहीही प्रश्न विचारला तरी त्या संताजवळ उत्तर फक्त राम राम हेच सेत असे. विप्र मंडळींना तेथे चर्चेस विनाकारण आल्याचा पश्चाताप होऊ लागला. एवढयात त्या संताच्या वास्तव्याच्या इिकाणी त्या आवारात काळया रंगांच्या गायींचा कळप शिरला व काही वेळाने बाहेर पडून त्या गायी पांढ-या रंगाच्या होऊन आल्या. विप्रांना खूपच आश्चर्य वाटले.  त्यापैकी एका गायीला वाचा येऊन ती बोलू लागली. '' हे विप्र हो !आम्ही नसोत गायी   आहोत चोविस तीर्थे ही  तुम्हां पतीतांच्या सेसर्गे  ही दशा होतसे आमची  म्हणून या संतचरण तीर्थी  स्पर्शुन पावतो पूर्णगती  संत चरणांची एैसीच महती   आश्चर्य काय करितसा '' द्रव्यशुध्दी, क्रियाशुध्दी व मन:शुध्दी यांनी यात्रा संपन्न होत असते. तीर्थ, दान व यज्ञ यांचे उचित फळ प्राप्त होण्यासाठी या तीन शुध्दीची अत्यंत जरूरी असते. एकवेह द्रवय शुध्दी व क्रिया शुध्दी घडू शकते पण सर्वसाधारण जीवांची मन:शुध्दी घडणे कठीण. देवी भागवत म्हणते ''मन:शुध्दी, चित्तशुध्दी हेच सर्वश्रेष्ठ तिर्थ आहे''.विवेक चुडामणी मध्ये श्री शंकराचार्य सांगतात -   अधिकारीणमाशास्ते फलसिध्दी विशेषत:   . एकदा साधक पुढचे पायरीवर गेला व एखादा खालच्याच पायरीवर पाहिला तर तो दोष साधना व सद्गुरू यांचा नाही तर साधकाच्या अंतकरण अशुध्दीचाच मानावा. म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात  
चित्तशुध्दी गिवसीतया  तीर्थांचिया सावाया   आली कर्मे    (ज्ञानेश्वरी अ. 18/159)

श्री नारद पंचरात्रात साधनेची पाच अंगे सांगितली आहेत. अभिगमन - उपादान - इज्या - स्वाध्याय व योग. यापैकी अभिगमन म्हणजे तीर्थयात्रा - निष्ठा - नम्रता - नीती - निर्भयता व निस्पृहता यांची कसोटी या यात्रेत असते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा   या महामंत्राचा अखंड जप, आई वडीलांचा आशिर्वाद व सद्गरू  कृपेची शिदोरी यांच्या बळावरच प.पु. श्री दत्त महाराजांची पावले तिर्थयात्रेकरिता गतीमान झाली.
सर्व सामान्य माणसांच्या सारखे सर्व सामान्य माणसात राहून संत हे आपले असामान्य कार्यकरीत असतात. संताच्या शब्दात, आशिर्वादात सामर्थ्य असते पण स्वत:कडे कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न घेता, देवापुढे सात दिवस सेवा करा, कल्पवृक्ष औदुंबराला प्रदक्षिणा घाला, दत्तांचा प्रसाद काही दिवस घ्या, ही विभूती घ्या व बघा काही गुण सेतो कां अशा सहज बोलण्यातून कार्य सिध्दी साधणारे आपले प. पु. रामदत्त महाराज विरळेच
कोणत्याही कार्य व साधना जीव ओतून केली तर सद्गुरू आणि भाग्य त्या उपासकाचे पाठीशी राहून त्या उपासकाला हजार हातांनी सहाय्य करीत असतात. सद्गुरू दत्तमहाराजांच्या कृपेचा हा अनुभव तुम्हां आम्हां सर्वांना याचा व त्यांच्या समवेत तीर्थयात्रा ही घडाव्यात ही श्री दत्त महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना

दि. 8 नोव्ह बर 2003                                   
त्रिपुरारी पौर्णिमा                                     

सद्गुरू चरणीचा विनम्र दास
मिलींद सुधाकर पांडे


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org