श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

तारांगणाचा कार्यक्रम पहात असतांना आपण जणू काही आकाशांत वावरत असून ग्रहांच्या अति निकट जात आहोत असे वाटत होते. हा कार्यक्रम प्रथमच पहात होतो त्यामुळे तयाबद्दल खूपच नाविन्य वाटत होते आणि ग्रहतारे यांचे ज्ञान होत होते. त्या ठिकाणचा तो एक तास कसा संपला हे कळले सुध्दा नाही. तारांगणाचा कार्यक्रम पहात असतांना प्रामुख्याने जाणवत होता तो तेथील माजी संचालक कै. पोतदार यांचा तेथे येण्याचा हार्दिक आग्रह! कांही महिन्यापूर्वीच के. पोतदार अकोल्यास आले होते. बडोद्यास आल्यावर त्यांचेकडे येण्याचे त्यांनी दिलेल आग्रहाचे आमंत्रण ! मी त्या ठिकाणी येणार व त्यांचेकडे जाणार या विचाराने कै. पोतदार एका निराळया उत्साहात वावरत होते पण विधात्याची योजना काही निराहीच होती आणि अचानक श्री पोतदार यांचे ह्दय विकाराने निधन झाले होते. त्यांनी दिलेले आमंत्रण व त्यांचे माझ्याशी आलेले संबंध यामुळे त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांची अनुपस्थिती मला विशेष जाणवत होती. इलाज नव्हता परमेश्वर, त्यांचे कर्तृव्त व मनमिळावू स्वभाव, त्यांनी तारांगण तयार करण्याकरता घेतलेले परिश्रम, यामुळे त्यांना सद्गती देईल याचा विश्वास आहे. एका तरूण व अत्यंत उत्साही खगोल शास्त्रज्ञाला आपणांस मुकावे लागले असे विचार मनात आल्यावाचून राहिले नाहीत. कार्यक्रम संपवून इतर मंडळी आपआपल्या निवासस्थानी गेली. आम्ही मात्र श्री मराठे, बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर यांचेकडे त्यांचे विनंतीवरून गेलो होतो. त्यांची विशाल वास्तु अतृप्त आत्म्याने दूषित केलेली होती. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक शांतता मिळत नव्हती म्हणूनच बर च वर्षापर्वी ते आपलेकडे येऊन गेले होते. त्याच वेळी त्यांनी निमंत्रण देऊन ठेवले होते. अनायसे हा बडोद्याला जाण्याचा योग आला आणि त्यांचेकडे जाणे झाले. पर्वी सांगीतल्या गेलेल्या उपायाप्रमाणे त्यांनी कांही तांत्रिक विधी वगैरे केल्यामुळे तो दोष त्यांचे जागेतून नाहीसा झाला होता. हे त्याठिकाणी गेल्यानंतर लक्षात आले. त्या जागेत भ्रमण करून आता कुठेही दोष राहिला नाही याची खात्री झाली होती. त्या आनंदात त्यांनी आग्रहाने पाद्यपूजा करण्याचा अट्टाहास गेल्यामुळे  नाईलाजाने होकार देणे भाग पडले व तो कार्यक्रम आटोपून आम्ही रात्री 11 वाजता श्री लिमये यांचेकडे जाऊन पोचलो.
दुसल्या दिवशी दि. 21-02-1980 रोजी गुरूवार असल्यामुळे सकाळच्या पूजेचा कार्यक्रम झाला. अकोल्याहून येणा-या सगहया मंडळींचे आज आगमन व्हायचं होतं. म्हणून त्यांना घेण्याकरिता स्टेशनवर जायचं होत. गांव नवीन असल्यामुळे त्यांना उतरवून घेण्यास जाणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे कांही जणांनी स्टेशनवर जाऊन त्यांना उनरवण्याच्या जागी आणून पोहचविलं. चहापणी, स्नान वगैरे आटोपुन सारी मंडही जेवण व गुरूवारचच्या आरतीच्या निमित्ताने श्री भास्करराव लिमये यांचेकडे आली. रात्री आरतीनंतर लवकरच निघायचे असल्यामुळे मोजकी मंडळी सोडून इतरांची जेवणं आरतीच्या आधीच करून घेतली. आरती झाली व जेवणं आटोपून रा9ी 11 वाजता जीरावाला कंपनीच्या बसने पुढच्या प्रवासाला सुरूवांत झाली. इतर मंडळी ज्या मंगल कार्यालयात उतरली होती तेथे बस नेऊन सगही मंडही बसमध्ये बसून री दत्तनामाच्या गजरांत बस पुढील प्रवासाचा मार्ग आक्रम लागली. बडोद्याहून बाहे पडतांना पुढील यात्रसंबंधी सगळया मंडळींच्या मनांत उत्सुकता वाढत होती. रिफायनरीच्या परिसरांतील दिव्यांच्या झगमगाट पाहून त्यांच्या भव्यतेची कल्पना येत होती. रस्ता विस्तीर्ण, चोपडा पण रहदारीने पूर्ण भरलेला असायचा. कारण तो त्या भागातील महामार्ग आहे. रस्ता मागे पडत होता आणि बहुतेकांवर निद्रादेवतेची कृपा होत होती. त्या ठिकाणी सर्वांनी प्रात:विधी आटोपून चहर कॉफी घेतली व 9-30 च्या सुमारास बस जामनगरचया परिसरांत शिरली.
मानव जन्माला येतो, कालमानाप्रमाणे वाढतो व कंर्मानुबंधाप्रमाणे बरे वाईट प्रसंग भोगत भोगत येवटच्या क्षणापर्यंत जातो. प्राक्तन असेल त्याप्रमाणे कुणी बालवयांत, कुणी प्रौढावस्थेत तर कुणी वृध्दापकाळी, पण शेवटी सगळयांना ह्या ऐहिक देहापासून मुक्त करून पंचतत्वात विलीन करून टाकणा-या भूमीकडे गेल्यायिवाय सुटका नाही. कारण तेथे देह नष्ट झाल्यावर आपल्या कर्माप्रमाणे बरी बरी वाईट योनी प्राप्त व्हायची असते आणि त्याकरिता स्मरण रहावे, हातून सतकृत्य घडावे म्हणून शेवटच्या क्षणाकडे व असस्थेकडे दुणीही दुलृक्ष करू नय याची जाणीव रहावी म्हणून आजपर्यंत भारतांत होऊन गेलेल्या संत व अवतारी पुरूषांचे पुतळे उभे केलेले आहेत व त्यांनी मृत्यूबद्दल जी कल्पना केली आहे, जे संदेश दिलेले आहेत व बांध केलेला आहे अशी बोधपर वाक्ये त्या त्या साशुपुरूषाच्या पुतळयाखाली लिलिलेले आहेत. मानवी देहाबद्दल आसक्ती न इेवता श्रीभगवत चरणी आसक्ती ठेवून सदगती मिळवा हाच संदेश देणा-या संतांच्या बोधवाक्याचे मनन करत फिरू लागलो. हीच ती संपूर्ण भारतातील सुप्रसिध्द जामनगरची स्माशानभूमि ! नश्वर देहाचे भस्म करणा-या जागेजवळून महापुरूषांच्या बोध वाक्याचे वाचन करत शेवटी बसकडे परत आलो. शेवटी या भूमीत जाऊन इहलोकची यात्रा संपविण्या आधी भगवत दर्यन यात्रा आराधना करून आपल्या गांठी काही पुण्याचा ठेवा करून ठेवावा हाच अर्थ प्रत्येकाने घेतला


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org