श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

वेळ सायंकाळची, दिवेलागणी व्हावयाचीच होती. किती दिवसाची आणि किती जणांची त्या वृक्षाने दर्शन घेण्याची तीव्र इच्छा आज ळया क्षमी पूर्ण होत होती. त्यामुळे प्रत्येक जण भक्ती भावाने त्याचे दर्शन घेत प्रदक्षिणा घालू लागला. नाम गजर होत होता ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा '' हया मत्रांचा नाम गजराने वातावरण भायन गेलं होत आणि टाळयांची साथ आवाजाला मिळत होती. पांच दहा मिनीट तो स्वर्गीय आनंद लुटत होतो. आम्हा आज्ञान बालकांच्या भोळया भाबडया भावभक्तीने उल्पसेवेला आशिर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणच्या सर्वश्रेष्ठ शक्तीने त्यांच्या करकमला मधील आमळा करिता धरून ठेवलेल्या खडीसाखर च्या प्रसादाचा सडा टाकण्यास सुरूवात केली. क्षणभर काय होते हे अज्ञानी मनाला कळलेच नाही. दृष्टीवर विश्वास बसेना व वाणी अवाक झाली. तो सुका मेवा उचलण्याची आज्ञा झाली आणि ते अमृतकण सगळयांनी उचलले, जन्माचे सार्थक झाले असच वाटल. झाडाच्या पानांचा आवाज झाला पुन्हा काजूचा प्रसाद मिळाला, आनंदाला पारावार राहिला नाही. पोचल्यानंतर 10 मिनीटाच्या आंत ऐकलेल्या कथा प्रत्यक्ष अनुभव होतो. दिवस भराच्या प्रवासाचा शीण व लागलेली तहान ळया प्रसादाने केव्हाच हरवून टाकली होती. आबाल वृध्दांनी महाराजांचा जयजयकार केला आणि नामस्मरण करीत वृक्षातळी आसन ठोकले. ओसंडत असलेल्या आनंदातच त्रिपदी गायली गेली. या वेळपर्यंत चांगलाच अंधार झाला होता पण महाराजांनी त्यांच्या कृपाछत्राखाली व त्यांच्या क्षेत्रात आलेल्या आम्हा अज्ञ जीवांना अंधारातही प्रसाद दिसावा अशी दृष्टी दिली व ती आम्ही सर्वांनी अनुभवली हे सत्य आहे!
प्रसादाने तृप्त झाल्यावर चहापाणी झाले आणि त्या परिसरात घडणा-या चमत्काराच्या उत्सुकता वाढविणा-या गोष्टी ऐकण्यात आलेले आणि लेख उतरवून घेतलेल्या वह्या प्रत्येक जण घडपड करून वाचू लागलो. शनिवारी सकाळ पासून साखळी पारायण सुरू करावयाचे असल्यामुळे त्याची योजना आणि पध्दतीवर चर्चा केली. रात्री त्या पवित्र स्थळी अन्न ग्रहण करण्याची आलेली सुवर्ण संधी कुणीही सोडली नाही. यथेच्छ जेवण झाल्यावर त्या पवित्र वातावरमांत उतरण्याकरिता दिलेल्या जागेत निद्रादेवीच्या आराधनेची तयारी व्यक्तीगत करून घेऊ लागले. झोप येत होती पण त्यापेक्षाही आपण महाराजांच्या सांनिध्यात आलो याचा आनंद मनात मावत नव्हता अशा आनंदी व पवित्र वातावरणात मध्यरात्रीचे सुमारास सगळयांनी जमिनीला पाठ लावली मोठा दिवा मालविला गेला.काही क्षण जातांत न जातांत तर अंगावर काहीतरी पडल्याचा स्पर्श झाला व आवाजही झाला. किंचित घाबरूनच हाताने चाचपून पाहिलं, कोणीतरी दिवा लावला आणि प्रकाश पडताच लक्षात आल की महाराजांनी मध्यरात्री खडीसाखरेचा प्रसाद दिला. प्रसाद गोळा करण्यास सगळयांचे हात पुढे झाले. प्रसादाचा प्रत्येक कण उचलल्या जात होता आणि मुखाने म्हंटल्या जात होतं ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा '' इतक्या रात्रीला आणि अपेक्षा नसलेल्या ठिकाणी सुध्दा श्री नृसिंहस्वामींनी येऊन प्रसाद टाकला आणि निर्भयपणे झोपा असाच जणू आशिर्वाद दिला. आल्यापासून त्यांच्या कृपाछत्राखाली होतो त्यामुळे अजाण भक्तांचे तोंड सतत गोड ठेवण्याची खबरदारी स्वामी घेत होते असे वाटते. कारण वाडयाच्या उजव्या बाजूच्या हॉल वजा पडवीत आम्ही झोपलो होतो. जवळच श्री भाऊसाहेब देशपांडे ही झोपले होते आणि प्रसादाच्या चर्चेत भाग घेत होत. धीर गंभर वाणीने फक्त म्हणाले की हया ठिकाणी आता पर्यंत तरी प्रसाद आला नाही. आश्चर्य आहे! त्या शब्दांनी आम्हा सगळयांना धन्य वाटले कारण पूर्वी न केलेली कृपा श्री नृसिंहसरस्वती स्वामी आमच्यावर करीत होते. हया सुखद गोष्टीतच निद्रादेवतेने आपला अंमल पुन्हा पसरविण्यास सुरूवात केली, आणि मोठा दिवा मालविल्या गेला.
सगळयांना झोप लागतच होती इतक्यात पुन्हा तोंडावर आणि अंगावर कांहीतरी पडल्याची जाणीव झाली आणि झोप पुन्हा उघडली. पहिल्या अनुभवाने अंधारातच चाचपून पाहिलं तर काजूचा प्रसाद हाताला लागला. श्री. मंगरूळकर यांनी काय आहे विचारल तेव्हा अमृतकण काजूचा प्रसाद म्हंटलं! प्रसाद हा शब्द उच्चारला गेला मात्र, पुन्हा सर्वजण स्वामींचा गजर करीत गोळा झाले. दिवा लागल्या गेला आणि सगळयांना प्रसाद दिल्या गेला. आज स्वामींनी पोटभर प्रसाद देण्याची योजना केलेली दिसेते. म्हणून तोंडातून उदगार निघाले. प्रत्येक जण काजूचा प्रसाद खात आपल्या जोवर निजले पण पुन्हा कदाचित प्रसाद आला तर? म्हणून कानोसा घेत होते. या वेह पर्संत रात्रीचा उक वाजला असेल. यानंतर मात्र केव्हा झोप लागली हे कळले नाही मनात नामस्मरण चालू होते. ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा '' श्री गुरूदेव दत्त ! श्री गुरूदेवदत्त.
सकाळी पारायणाला सुरूवात करायची होती आणि प्रात:विधी आंघोळी आटोपण्यास वेळ लागणार होता म्हणून सहाजिकच सगळी मंडळी लवकर उठणार होती. सकाळी 3    चा सुमार असेल. जाग आला, उठलं पाहिजे म्हणून म्हंटल ! आणि उठून बसतो. श्री मंगरूळकर उठले, दिवा लावला तो काय आश्चर्य त्यावेळी पुन्हा अंथरूणावर काजूच काजू दिसेल. भल्या पहाटे पासूनच महाराजांनी प्रसाद वितरणांस सुरूवात केलेली दिसली. आवश्यक ते कार्यक्रम उरकून स्नानांनी प्रत्येक जण घाई करू लागला (पंपाच पाणी) पवित्र भूमीतील ती विहीर, जणू संगमातील पवित्र जलाचा तो साठा गाणगापूराहून, स्वामीनी भक्तांना उध्दरून नेण्यासाठी आपल्या सोबत रिध्दपूरला आणला असावा ! भक्तांच्या काळजीने त्या विहीरीवर पंपही बसवून घेण्याची योजना पूर्वीच साहार झालेली होती. त्यामुळे कुंडातील पाणी गायमुखातून पडाव तसं पाईप मधून पडून वहात होते. स्नान विधी आटोपून चहा प्राशन करून देवदर्शन घेतलं आणि प्रत्येक जण धावला तो कल्पवृक्ष औदुंबराकडे.

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org