श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

सायंकाळी दिवे लागणी झाली पुन्हा एकवार  सगळयांनी वृक्षाखाली आसन मांडलं आणि नामस्मरण करण्यात वेळ घावू लागले. कारण पारायण अद्यापी बराच वेळ चालणार होत. 8 च्या सुमारास 6 दिवसांचे वाचन पूर्ण झाले आणि सातव्या दिवसाचे अध्याय वाचण्यास स्वत: सुरूवात केली, नृसिंह सरस्वती स्वामींच्या नेहमी वास्तव असणा-या पादुकासमोरच पारायण सुरू होते तो पर्यंत स्वामी ते ऐकत आहेत याची अधूनमधून कल्पना होत होती. पारायण पूर्ण झालं आणि अवतरणिका अत्यंत शांततेने वाचू लागलो. सगळया ग्रंथाच सार म्हणजे अवतरणिका ! अत्यंत शांततेने वाचू लागलो. सगळया ग्रंथाच सार म्हणजे अवतणिका! ती सगळयांनाच ऐकायला मिळावी म्हणून अर्थातच मोठयाने वाचल्या जात होती आणि श्री रेणुका आणि पिंगळा माता यांचे नैवेद्य तयार होताच महाप्रसादाचा. तो नैवेद्य श्री गजानन महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्री रेणुका आणि पिंगळा माता यांचे नैवेद्य त्यांचे समोर ठेवून नैवद्य दाखविला. श्री गजानन महाराजांना मोदक आणि कडबू आवडतात म्हणून पुरणपोळी बरोबर तेही नैवेद्यावर होतेच. श्री स्वामींना करंजी आणि बासुंदी आवडते म्हणून कळले होते म्हणून तेही नैवेद्यात केले होतेच. ह्या दाखविलेल्या नैवेद्यावर पत्रावळीचे झाकण टाकूण आरती करण्यापूर्वी सर्व देवतांनी नैवेद्य ग्रहन करावा म्हणून विनम्र भावाने पुन्हा विनंती करून आरतीला सुरूवात केली. पेऐ, बरफी, खडी साखर इत्यादीचा प्रसादराचा नैवेद्यही पूर्वीच दाखविला गेला होता व तोही महाराजांचे चरणी ठेवला. अती उत्साहाने आरतीची सुरूवात झाली आणि तेथील पध्दती प्रमाणे आरती नंतर तो गाभारा बंद करून सर्वजण औदुंबराची आरती करण्यास तिकडे गेले. त्या ठिकाणी आरतीचे वेळीसुध्दा पुन्हा प्रसाद मिळाला. आरती आटोपून देवघरातील पोथीच्या जागी परतलो. दरवाजा स्वत:च उघडून आत आलो. श्री भाऊसाहेबांनी मला बोलावनं आणि नैवेद्या वरील पत्रावळी उचलून बघा म्हणून सांगितल. त्यांच्या आदेशाप्रमाणे नैवैद्यावरील पत्रावळ उचलली मात्र.. क्षणभर आपण काय पहातो आहोत हे कळेनासे झालं डोळयावर विश्वास असे ना ! कारण नैवेद्याच्या ताटातील पक्वान्न पुरणपोळी, कडबू, प्रसाद श्री गजानन महाराजांनी गहण केला होता. प्रत्यक्ष परमेश्वर नैवेद्य भक्षण करीत आहे हे पाहण्याचं भाग्य लाभलं. धन्यता वाटली. सगळयांना बोलावून तो अभूतपुर्व चमत्कार दाखविला गेला नंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामीच्या पादुका समोरच्या नैवेद्यावर ठेवलेली पत्रावळ उचलली तर, तीच स्वामींची कृपा. स्वामींनी पारायणाच्या नैवेद्याचा स्विकार केलेला दिसला. पक्कान्न आणि बासुंदीच्या वाटीतील बासुंदी महाराजांनी कृपा प्रसादाने ग्रहण केलेली दिसली. अजाण भक्तांना अमृताचा लाभ व्हावा म्हणून वाटीत थोडे पक्कान्न ठेवले होते. प्रसाद देण्यासाठी म्हणून ! खरी वाटणारी गोष्ट प्रत्यक्ष पहात होते. परमेश्वर अज्ञानी भक्तावर कृपा करतो.त्याचा जर भाव असेल तर नैवेद्य स्विकारतो हे प्रत्यक्ष अनुभवित होतो. स्वामींनी नैवेद्य भक्षण केला. जन्माला आल्याच सार्थक झाल. तिसरा नैवेद्य महामाया जगदंबेचा.. त्या दिवशी श्री रेणुका देवी देवी मात्र जेवली नसावी. कांहीतरी चूक या अज्ञ बालकाकडून झाली की काय न कळे. कारण श्री रेणुका मातेने फक्त भाताला हात लावलेला दिसला पण ग्रहण मात्र केला नाही, का न कळे! तिची क्षमा मागीतली आणि जेवणाचे पान घेतले असल्यामुळे प्रत्येकजण प्रत्यक्ष परमेश्वराने नैवैद्याचे ताटात ठेवलेल्या शेष पक्कानांच्या अमृताचा प्रसाद केव्हा ग्रहण करायला मिळतो याची आतुरतेने वाट पहात होते, प्रत्यक्ष अमृतच ते ! ग्रहण करण्याची घाई झाली नाही तरच नवल! महाराजांनी पेढयाचाही नैवेद्य सिकारला होता आणि अल्पशी दक्षणाही स्विकारली होती आणि आम्हावर कृपा केली.
जेवायला सुरूवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा नमस्कार करण्या करता तेथे गेलो त्यावेळी पेढे व बरफी चा आणखी नैवेद्य पादुकांचे ओटयावर ठेवला. उद्देश हा की महाराजांनी तो स्विकारावा. आणि जेवणास सुरूवात केली जेवण झाल्यावर घडयाळात पाहिलं तर रा9ीचे 11-30 झाले होते. त्यामुळे मंदिराच्या गाभा-यातील पोथी आणि इतर साहित्य हलवायलाच पाहिजे होतं. कारण त्याच ठिकाणी महाराजांचे झोपण्याचे पलंग टाकण्याची जागा होती. म्हणून ते आवरण्यांत गेलो तो पुन्हा आश्चर्याचा धक्का.महाराजांनी भोळया अज्ञ भक्ताचा पेढयाचा नैवेद्य दुस-यांदाही स्विकारला होता. आनंदाला पारावार राहिला नाही. ज्या भगिनींचे जेवण राहिले होते त्या सगळया आल्या, जेवायला अमृत ग्रहण करायला बसल्या होत्या. मंदिरात गेलो तर, पहिल्या आनंदाच्या भरात पोथीच्या पुढचा प्रसाद जेवायच्या वेळी घेण्याची आइवण राहिली नाही हे लक्षात आले आणि ज्यांची जेवण व्हायची राहिली होती त्यांना त्याचा लाभ घेता आला.
दिवस भराच्या एक सारख्या बसण्यामुळे केव्हा एकदा जमिनीला पाठ लागते असे झाले होते आणि त्याच कारणाने झोपण्याच्या पडवीत जाण्यापूर्वी आनंदाने पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घेतले आणि झोपण्यास गेलो. रात्री झोपल्यानंतर प्रसाद येतो म्हणून की काय माझ्या शेजारी जागा मिळविण्याची कांही जण घडपड करतांना दिसेल. आज, कालची जागा बदलवून दुसरीकडे अंथरूण टाकलं होत. जागा आणि दिशाही बदलली होती. अंथरूणावर पडून गप्पा चालल्या होत्या - महाराजांच्या नैवेद्य स्विकारण्याच्या. इतक्यात डाव्या हातावर कांहीतरी सपाटून पडल्याचं कळलं. पाहिलं तर 3 पेढे. पेढयांचा प्रसाद येण्याचा आमचा तो पहिलाच प्रसंग ! पेढे आले ऐकलं मात्र पुन्हा सगळे जण प्रसादाकरिता गोळा झाले. 3 पैकी एक पेढा श्री मंगरूळकर यांचे दिशेला होता. तो त्यांना उचलण्यास सांगितल आणि 2 पेढयांचा प्रसाद सगळयांना वाटून जेवत असलेल्यांना सुध्दा देण्यास आंत गेलो. त्यावेळी तर पेढयाच्या प्रसादाचे वेळी आपण गैरहजर राहिलो याचे कांही जणांना वाईट वाटल्याचे दिसले. पण तोही पानावर मिळालाच. म्हणून मनाची समजूत घालूज मनाला शांत केलं त्यांनी ! बरोबरची मंडळी बरीच आणि झोपण्याची सोय जागेनुसार व्हायची म्हणून कांही भगिनी देवघरासमोरच्या पडवीत झोपणार घालून होत्या त्यांनी आपल्या अंथरूणाची सोय करून घेतली. थोडयावेळाने पुन्हा खडीसाखरेचा प्रसाद आला. ठरल्या प्रमाणे सगळयांनी प्रसाद घेऊन सर्वजण दिवसभरांत आलेल्या कृपाप्रसादाचे आणि चमत्काराचे विचारांत रंगून गेले. त्या आनंदातच केव्हा झोन लागली हे कळले नाही.
रविवारी सकाळी सर्व आवरून लवकर केकतपूरला जावयाचे होते आणि म्हणूनच सर्वजण उठून, प्रात:विधी आटोपून, चहा कॉफी घेऊन, आंघोळी करून देवदर्शन व औदुंबराला प्रदक्षणा घालून मिळेल तो लाभ उठवित होता. औदुंबराला प्रदक्षणा घालून पंचायतन महादेवाचे आणि प्रभाकर महाराजांच्या देवघरातील जागेचे दर्शन घेऊन बाहेर पडणार ता च श्री मुळे जवळ आले आणि श्री भाऊसाहेब देशपांडे आपली देवघरात वाट पहात आहेत म्हणून म्हणाले त्याप्रमाणे तिकडे गेलो. तर श्री भाऊसाहेब देशपांडे हांतात पिवळया काठाचे उपरणे - रूपया - नारळ हातांत घेऊन उभे असलेले दिसले. पाटावर बसण्याची त्यांनी आज्ञा दिली म्हणून पाटावर बसलो आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे हा प्रसाद देतो म्हणून म्हणाले, त्या महावस्त्राचा-प्रसादाचा मोठया आंनंदाने स्विकार केला. कारण खाण्याच्या प्रसादापासून तर वस्त्राच्या प्रसादापर्यंत सगळयाच प्रकारे महाराजांनी प्रसाद देऊन या मानवाला, देहाला पुनीत केल होतं. पहिल्याच दर्यनाचे वेळी महाराज इतका कृपा प्रसाद देतीन याची अंधुकशीही कल्पना नव्हती.त्यामुळे याठिकाणी येऊन जन्माच कल्याण झालं ! आईवडिलााच्या आशिर्वादाने महाराजांची भेट झाली. कृपा प्रसादाचा लाभ झाला याशिवाय दुसरं काय? महावस्त्राचा प्रसाद मिळाला त्या क्षणीतर अंत:करण भरून आलं आणि आनंदाश्रु आले. भाऊसाहेबांना वंदन करून कल्पवृक्षाखाली ते महावस्त्र अंगावर घेऊनच प्रदक्षणा घातल्या आणि विनम्र भावाने नमस्कार कस्न त्या कल्पवृक्षाकडे पहात पहात परत निघण्याकरीता निरोप घेतला. निघायचं होत म्हणून निघालो पण पाय तात्र त्या परिसरातून बाहेत पडत नव्हते. कारण दोन दिवसाच्या वास्तव्यांत त्या वातावरणांत रमून गेलो होतो.

 

 

 

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org