श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

सकाळी सात वाजतां मोटार स्टँड गाठायचं ठरल होतं पण निघता निघता आणि इतरांना काढता काढता सात मंदीरातच वाजले होते. त्याच क्षेत्री श्री संत गुलाब बाबा म्हणून एक व्यक्ती वास्तव्य करीत आहे. त्यांचा दरबार म्हणून जी इमारत आहे, ती मंदीराजवळच आहे. त्याठिकाणी असाध्य असणारेविकार त्यांच्या विभूतीने बरे होतात असा अनुीव आहे व त्यांचेकडेही श्री नृसिंह सरस्वती स्वामींचेच ठाणे आहे म्हणून उत्सुकता म्हणून सगळेजण तिकडे जाऊन नंतर स्टँडवर आलो. मोटार आली नव्हती. येऊन बराचवेळ झाला. पण नेहमीपेक्षाही मोटार उशीरा आली. जवळजवळ साडे आठच्यासुमारास. तोपर्यंत आम्ही तो परिसर सोडू नये अशी श्री महाराजांची इच्छा असावी म्हणून मोटार उशिरा आणली असेल. त्यांची किमया जाणण्यास कोण समर्थ आहे? खचीतच कुणीही नाही!
त्या मोटारीत सगळयांना एकदम जागा मिळणार नाही म्हणून कांहीजणांना मागे रहावे लागणार त्यामुळे कुणी मागे रहायचे वैगैरे सगळे बेत आखल्या गेले, पण योगायोग असा की सगळयांना मोळारमध्ये जागा मिळाली. त्यामुळे इतर प्रश्न उद्भवले नाहीत. एक तसाचे आंतच आम्ही लेहगांव फाटयावर येऊन पोचलो. तेथून अमरावती मार्गे जाणा-या मोटारीची प्रतिक्षा करणार होतो. तेथेही हीच अवस्था. एकदम जागा कशा मिळतील ? पण महाराज सदैव पाठशीच होते त्यामुळे तेथून पुढे जाणा-या मोटारीत सगळयांना एकत्र जागा मिळाली आणि सगळेजण 10 च्या सुमारात केकतपूर फाटयावर उतरलो. सामानाकरिता एक बैलगाडी बोलावली होती ती आली होतीच. त्यात सर्व सामान भरून वृध्द आई व तीच्या समवयस्क व्यक्तीला व आदी लहान बालकासह तो केकतपूर यात्रेचा रथ धीमे पाऊल टाकत केकतपूर मार्ग आक्रम लागला.
एका क्षेत्राचे दर्शन घेऊन आलो पण केकतपूर यात्रा पूर्ण व्हायची होती म्हणून अतीउत्साहाने सर्वजण रस्ता आक्रमू लागले. 1 मैलाची ती पदयात्रा बोलता बोलता संपली आणि गावाबाहेरच गावात शिरताच डाव्या हातास लागणारे श्री दत्तमंदीर दिसेल. घरी जाण्यापूर्वी दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा ! त्यामुळे अगोदर दर्शन घेऊन मग पुढे सरकलो. रामभाऊ देशमुखांना पूर्व कल्पना असल्यामुळेच स्वत:च त्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. घरी पोचताच चहापान आटोपून श्री दत्ताच्या पूजेची तयारी केल्या गेली आणि पुन्हा सर्वजण दत्तमंदीरात दाखल झालो. बरेच दिवसाने त्याठिकाणी मुतींच्या पुजेचा योग आलेला त्यामुळे एक प्रकारचा उत्साह ओसंडत होता. योगायोग असा की, श्री साबदे आणि श्री आप्पासाहेब शहाणे यांनी यथासांग पूजाविधी सांगून अभिषेकही सांगितला त्यामुळे त्या वेळेला फारच मंगल आणि पवित्र वातावरण मंदीराच्या परिसरात भारून गेले होते. पूजाविधी आटोपल्यावर उत्साही भगीनी - भक्तमंडळींनी पंचपदी गायिली त्यावेळीतर कमालीचे शुध्द, शांत व पवित्र वातावरण अनुभवास येत होते.
कै. श्री रामभाऊ काकांच्या समाधीची पूजा करून आरती झाली. त्यांच्या ध्यान धारणे करिता त्यांनी गाभा-याखाली करून घेतलेल्या भुयार खोलीत जाण्याचा कांहीजणांनी प्रयत्न केला आणि हां हां म्हणता लहानथोर सगळयांनीच त्या पावन झालेल्या जागेत डोळे भरून निरीक्षण केले व दर्शन घेतले. प्रसाद घेऊन सर्वजण घरी परतले तो पर्यंत 3  चाजले होते. त्यानंतर फराळ, जेवण वगैरे करून थोडा आराम केला. चहापाणी करून 5 - 30 च्या सुमारास परत निघालो. परत निघतांना पुन्हा एकदा श्री दत्ताचे दर्शन घेऊन पुन्हा पदयात्रा सुरू केली. फाटयावर आलयावर 1  तासीभर पुन्हा मोटारीची प्रतिक्षा करावी लागली.तेथून ही एकाच मोटारने सर्वजण अमरावतीला पोचलो. मोटार सरळ श्री जगदंबेच्या देवळाजवळ गेली त्यामुळे सगळयांनी मंदीरात जाऊन दर्शन घेतले व रेल्वे स्टेशनवर आलो. 11-30 ला गाडीने स्टेशन सोडले. बडनेरा आले. स्टेशनवर श्री मुळ  समवेत चर्चा करीत वेळ घालविला. गाडी येतांच सगळयांनी गाडीत जागा मिळविली, गाडी सुअली आणि सर्वजण झोलल्या यात्रेच्या गोड कल्पना आणि अनुभव याची खानेसुमारी करू लागला. अकोला आले आणि सर्वजण घरोघरी पोहोचलो. दोन्ही ठिकाणचे दर्शन ठरल्याप्रमाणे नव्हे तर अपेक्षे पेक्षा चांगले झाले याच समाधानात प्रत्येकजण घरी परतला.

  श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त   रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरसवती स्वामीमहाराज की जय   श्री रामचंद्रसरस्वती स्वामीमहाराज की जय  
गुरूदेव दत्त ... गुरूदेव दत्त ... गुरूदेव दत्त ...!

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org