श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

  श्री क्षेत्र गिरनार यात्रा 

मानवी देहाने कोणत्याही, कितीही गोष्टी ठरविल्या तरी ईश्वरी संकेत जर तसा नसेल तर त्या गोष्टी शेवटास जात नाहीत. परंतु योगायोग आणि कृपाप्रसाद असेल तर इच्छा नसतांनाही अनपेक्षित गोष्टी घडत असल्याचे अनुभव येत असतात. पण त्याला सुरूवात होण्या करिता कांहीतरी कारण घडावं लागतं आणि नशिबात असलं तर प्राय: अशक्य वाटणारी घटना सहज शक्य होऊन जाते. हे कोडं जर मानवाला कळलं, तर ईऱ्वरी संकेत म्हणून म्हणण्याला कांही अर्थ राहिला नसतां म्हणूनच तया अनादि, अनाकरनीय, पदोपदी अनुभव आणूण देणा-या शक्तीचे महत्व ह्या अहंगंड बाळगून वावरणा-या क्षणभंगूर देहाला वाटल नसतं आणि म्हणूनच विधात्याने कांही गोष्टी हात राखून ठेवल्या आहेत. जोतिष्य शास्त्राने पुएील भाकित वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे.हे शास्त्र आहे, पण अखेर ते अचूक वर्तमान वर्तविण्याचा मानवी प्रयत्नच आहे म्हणूनच अनाकलनीय शक्तीचे गुह्ा आपणांस ज्ञात होऊच शकत नाही, हेच खर !
मानवी इच्छा फलद्रुप की नाही याची शाशंकता त्या शक्तीजवळ नाहीच, ती पूर्ण करावयाची हेच ती शक्ती इरविणार व आपल्याला तसे अनुभावायला येणार पण ज्ञ मानवी जीव अल्पानंदात मशगूल होऊन मी ठरविलेलं केलं, मी अशी योजना ठरविविली, तशी यशसवी केली ह्या च्या गोष्टी करतो पण त्याही कोणाच्या भरवशांवर करतो कळत नाही. अनित्य शरीराचा भरवसा देऊनच तो सारा अवडंकबर रचत असतो. ऐवढेच नाही तर विश्वासाने हे करून दाखवतो म्हणून ट भा मिरवीत असतो. कारण तरो अज्ञ तरी तो स्वत:ला सर्वज्ञ समजत असतो. कर्तुम अकर्तुम मीच मी ठरवितो व करून दाखवितो ह्याचा अभिमानांत वावरत असतो तो त्याचा दोष नाही. तो ज्या नश्वर जगांत वावरतो ते त्याला प्रोत्साहन देत असते पण नियतीला जर ते मान्य नसेल तर ती त्याला स्वत:च्या इच्छेप्रमाणे वाकवून प्रारब्धी लिहिले असेल तेवढेच माप त्याच्या पदरांत टाकते, प्रयत्न कस्नही त्यापेक्षा जास्त लाभ त्याला मिळत नाही व घेण्याची इच्छा नसतांनाही, जर योग असेल तर त्याला घेतल्यावांचून गत्यंतर रहात नाही.
चार वर्षापूर्वी रिध्दपूर यात्रा झाली. खूप आत्मानंद मिळाला. सगळयांना अनुभवायाला तो आनंद आजही प्रत्येक जण कल्पनेत उपभोगतो. पुन्हा असा योग क व्हा येणार? म्हणून स्वत:च्या मनाला प्रश्न करून आतुरतेने वाट पहातो. म्हणूनच म्हटलं की त्या अनादि शक्तीचं वेळापत्रक इतरांना ज्ञात होऊ शकत नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणं काहीतरी निमित्य घडावं लागतं त्या प्रमाणे ब-याच दिवसांपासून आमंत्रण येत असूनही, पण योग आला नसल्याने बडोद्याला जाण्याचं टाळल्या जात होतं. यावर्षी जाऊ, पुढल्या वर्षी जाऊ म्हणून टाळल्या गेले. पण ह्यावर्षी दिवाळीच्या वेळीच बडोद्याला जाण्याचा बेत निश्चित केल्या गेला. न आला सुट्टीचा ! सुट्टी मिळण्याचे निश्चित झाल्यावर कार्यक्रम इरू लागले व तारीख ठरली. पण योग कांही निराळाच होता. अचानक कल्पना आलइ व ती फलद्रुप होणार अशी चिन्हे दिसू लागली. बडोद्याहून अचानक पत्र आलं आणि आपण बडोद्यापर्यंत येणारच आहांत तर गरूडेश्वर, गिरनार दर्शन करावं अशी इच्छा आहे म्हणून विचारलं गेलं. अर्थात ह्या दुर्मिळ दर्शनाला कोण नाही म्हणणार ? आणि झालं पुढील कार्यक्रम ठरविल्या गेल्या. तीन कुटुंब मिळन सात- आठ लोकांनी जायचं ठरलं. पण योग निराळा होता. मानवी मन संकुचित, मी, माझं, आपलं ही उपाधि त्याला कशी सोडेल? म्हणून थोडया मोजक्यांचीच योजना ठरणार होती. पण हे विर्श्वाचे माझे घर ! ह्याचा विसर ती शक्ती कशी पडूं देईल? म्हणून की काय बडोद्यापासून पुढच्या प्रवासाची चौकशी सुरू झाली व 35 जणांची बस आहे असे कळले. आपली थोडी मंडळी व बाहेरचे सहली प्रवासी राहणार असे होते. पण जर आपलीच श्रध्दावान मंडळी असली तर आणखी बरे होइृल ह्या विचाराने कोण कोण येण्यास तयार आहांत म्हणून विचारण्याचा अवकाश की चाळीस जणांची यादी तयार झाली पण बस पस्तीस जणांची होती  त्यामुळे इतरांना नाराज व्हावे लागले. पण इलाज नव्हता. दि. 18-2-1980 ला अहमदाबाद गाडीने निघायाचे ठरले आणि त्याप्रमाणे तिकिटांचे आरक्षणही केल्या गेले. यात्रेला निघण्याचा दिवस जवळ जवळ येत होता. सगळयांना एका दिवशी व एका गाडीचे आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे काही मंडळी 20-02-1980 रोजी निघून बडोद्यास येऊन पोचणार होती.
आम्ही अकोल्याहून चार जणू नागपूर व छिंदवाडयाहून येणारी मंडळी मिळून नऊ जण बडोद्यास 19-02-1980 रोजी चार वाजता जाऊन पोहचलो. त्यावेळी री ग्रदे कुटूंबीय व श्री लिमये कुटूंबीय मंडळी आमच्या स्वागतासाठी रेन्वे स्टेशनवर आलेली दिसली. उतरण्याची व्यवस्था ज्या मंगल कार्यालयात करण्यांत आली होती त्या ठिकाणी इतर मंडळींना पोचते करून आम्ही उीयतां श्री लिमये यांचेकडे गेलो. बरेच दिवसाने त्यांची इच्छा फलद्रुप होणार होती म्हणून त्यांच्या घरचे वातावरण फारच आनंदी व उल्हासित होते. घरी पोचल्यावर आवश्यक ते विधी आटोपून स्नान वगैरे झाले व भेटायला येणारी मंडळी सुरू झाली त्यांच्याशी  बोलून व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा इरवून तो दिवस उलटला. दुसरे दिवसी दि. 20-02-1980 ला सकाळी थोडे बाहेर फिरून इतर मंडळींची भेट घेतली व दुपारचा कार्यक्रम इरवून घरी परतलो. दुपारी 3 वाजता निघून कमाटीबाग नावाचे उद्यान पहाण्यास गेलो. त्या ठिकाणी उद्यानाबरोबर प्राणी संग्रहालय आहे. निरनिराळे जिवंत प्राणी चांगल्या अवस्थेत आजही इेवलेले दिसले. 6 वाजेपर्यंत फेरफटका करून श्रमपरिहार करण्याकरता व लहान मुलांच्या करमणुकीकरिता असलेल्या ठिकाणी जाऊन आलो व रात्री 7 वाजता होणारा तारांगणाचा हिंदीतील कार्यक्रम पाहिला.

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org