|
अनुभव जे जाणती मंत्र मूलंगुरोर्वाक्यं मोक्षमूलां गुरुक़ृपा गुरुगीता आपल्या गुरुविषयी जे जे ज्ञान प्राप्त होईलए ज्या योगे त्यांच्या वरील श्रध्दा अधिक बलवती होईल ते ते सर्व ज्ञान प्राप्त करणे हे प्रत्येक सत्शिष्याचे परमकर्तव्य होय. अशा कर्तव्याला सहाय्यभूत होईल असे साहित्य निर्माण करणे हे तर शिष्याचे महत् कार्यच ठरते. तेव्हा श्री दत्त महाराजांच्या जीवन कार्याचे काही अंशी अनुभवाचे संकलन श्री. महाराजांच्या भक्तांसाठी या ठिकाणी देत आहोत. त्यांचा हा अगाध महिमा भक्तांच्या स्वशब्दातच मुळ भावना लक्षात घेता प्रकाशीत करीत आहोत. ''अनुभव जे जाणती । सद्गुरुपदीचे अभिलाषी'' मिलींद सुधाकर पांडे
|
|