श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरूचरित्र चौथा दत्तावतार
गुरूकृपा सरिता
श्री रामचंद्र सरस्वती स्वामी महाराज अकोला
श्री रामचंद्र सरस्वती आख्यान

॥ श्री रामगुरू चरित्र ॥

प्रास्ताविक
॥ श्री गणेशाय नम: ॥
॥ श्री गुरूदेव दत्त ॥
॥ श्री रामदत्त महाराज प्रसन्न :॥

परमपूज्य 'श्री रामदत्त महाराजांच्या' चरित्र ग्रंथाची प्रथम आवृत्ति इतया थोडया अवधीत संपून दुस:या आवृत्तीच्या प्रकाशनाची निकड येऊन ठेपली हा खरोखरच एक चमत्कार आहे. एका अर्थाने ही श्री गुरूदेव दत्तांची कृपाच आहे. तसे पाहूं गेले तर श्री रामदत्त महाराजांचे एकंदर जीवन हाच एक मोठा चमत्कार आहे. विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा जवळ पांगरी नावाचे एक अगदी लहानसे गाव आहे. तेथे कुळकर्णी कुटुंबाचे जवळ जवळ दोनशे वर्षाचा इतिहास असलेले घर आहे. आजही हे घर र्बया स्थितीत आहे. या घरात सत्तर वर्षापूर्वी श्री रामदत्तांचा अवतार झाला. जन्माच्या वेळी शरीर यष्टी अगदीच किरकोळ होती. सतत रडणे आणि किरकीर चालु असायची. बारसे करून गोपाळ नांव ठेवण्याच्या गोष्टी घरात चालायच्या बाळाची प्रकृति काळजी करण्यासारखी होती. किरकीर रडणे थांबायचे नाही. मातोश्री सौ. सरस्वती बाईंनी अनेक देवदेवतांना नवस केला. त्यात कुलस्वामिनी श्री रेणुका खंडोबा ग्रामदैवत भैरवनाथ गणपती बालाजी सगळे झाले. पण फरक असा पडला नाही. आईच्या मनात कसे आले कोण जाणे पण ती म्हणाली हे रामभाऊ महाराज तर नाहीत ना ॠ तसे असेल तर त्यांचेच नाव ठेवूं. आणि काय आश्चर्य! नव्हे चमत्कारच !! रडणे किरकीर कमी होऊन प्रकृती सुधारू लागली. बारसे झाले आणि रामचंद्र हे नांव ठेवण्यात आले. कोण हे रामभाऊ महाराज .

पुढील पान

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org