श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 43 वा ॥
॥ श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।गिरीपति लक्ष्मीकांता । व्यंकटेशा कुलदैवता । गिरीशिखरीवैभवे नांदत । जागृत असे कुलदैवत । ।1 । । जय जय महामंगले । शिवगौरी महामाये । पूर्णावतार जो परब्रम्ह ।अविनाशीतो परिपूर्ण । ।2 । । गुरूदेवाचे चरण । परममंगल पावन । चरणधूळ लावून । देह पवित्र होत असे । ।3 । । गुरूदेवा दत्तात्रया ।गुणत्रया करूणालया । कृपावंता सदया । तुंचि रक्षिता निरंतर । ।4 । । त्रयमुर्तिचा अवतार । करावया जगदोध्दार । रामचंद्रसरस्वती थोर । परममंगल सद्गुरू । ।5 । । जैसा असतो योगायोग । तैसा येता समय योय । उपदेश करिती यथासांग ।गुरूदेव समयोचित । ।6 । । त्रिकालज्ञ तो योगीराणा । याचे प्रत्यय अनुभवण्या । प्रश्नोत्तरी श्रवण करा । प्रति गुरूवारीसृजन हो । ।7 । । पूर्ण व्हावया अवतारकार्य । उतरण्या भूमीभार । जागृत शक्ति वैभव थोर । सद्गुरू कार्य करिताती । ।8 । । श्रवणस्मरण ध्यान । निजध्यासमनन ।तीचोढजीवालागून । कृपा-रहस्य तेचि जाणा । ।9 । । सद्गुरू रामचंद्रसरस्वती । प्रपंच मार्ग स्विकारिती । स्वयंभु असोनी सिध्द यती । शिष्यास ही मार्ग दाविती । ।10 । । प्रपंच परमार्थाचामार्ग । सुगम करूनी स्वयंसिध्द । जीवनराहटी यथासांग । शिष्यासवे चालती । ।11 । । जैसा रंग सुगंध फुलात । सहजअसतो नैसर्गिक । तैसे अष्टांग सिध्दियोग । सद्गुरू ठयी अव्याहत । ।12 । । अंर्तबाहय लक्षणे । जी का कथियेलीश्रुतीनी । ती परिपूर्णपणे । श्रीरामचंद्र दाविती । ।13 । । धन्य धन्य तुम्ही सुजन । लाभले सद्गुरूंचे चरण । नित्य घेउनिदर्शन । जीवन मुक्त व्हावे हो । ।14 । । गुरूदेव दत्तप्रभू । तयाची कृपा अथांग । ज्ञानाचा तो सागरू । कृपासमुद्र भक्तासाठठ्ठ । ।15 । । ज्याने अर्पिले जीवन । तोचि असे परिपूर्ण । जगदोध्दाराविण । अन्य नसे दुजे काही । ।16 । । चंदनकाया झिजवुनी । ज्ञानज्योत पाजळोनी । दिव्य करी भक्ताकारण । योगीराज रामचंद्र । ।17 । । पौर्णिमेचा पूर्णचंद्र ।सरस्वती सखा योगींद्र । कुळदिपक सवेश्वर ।स्वयंप्रकाशित भुवरी । ।18 । । दिव्य करूनी साकार । जगदात्माा सर्वेश्वर ।खेळे विविध प्रकारे । मानवी जीव सांभाळी । ।19 । । जे का आहेत सगुणात । तेच ते निर्गुण सत्य । नित्य । नित्य शांतनिर्विकल्प । पूर्णब्रम्ह जो जाण । ।20 । । पूर्णावतार जो अविनाशी । जगी भक्त तारावयासी । नित्य जागृत भूवरती ।गुप्तरूपे योगीराणा । ।21 । ।जीवनगाथा रामचंद्राची । कार्य करण कार्याची । लिहिता लिहिण्या शब्दांची । त्रुटी असेभाषेची । ।22 । ।ऐसे अथांग थोर । कार्य करिती भूवर । प्रपंची परमार्थ सार । अलौकिक जयांचा । ।23 । । कार्यासिध्दिचासुगंध । दरवळतो अथांग । भक्त अनुभवा सांग । शब्द न पुरती बापुडे । ।24 । । दयासागर परिपूर्णा । पूर्णब्रम्हा सगुणा ।अनन्यभावे तुझ्या चरणा । आम्ही दास जन्मोजन्मी । ।25 । । गुरूभक्तीचा महीमा । न कळे अगमानिगमा । पूर्णब्रम्हा त्यापुरूषोत्तमा । वर्णण्या वाणी अपुरी । ।26 । । गुरूमायेची प्रसवीसमुर्ति । ध्यानी धरावी चित्ति । प्रेमभाव ओसांडिती । नयनीरूप देखता । ।27 । । जन्मोजन्मीची पुण्याई । म्हणून पाहिले चरण डोळी । अव्याहत गुरूमाउली । भक्तारक्षण करीतअसे । ।28 । । अनेक जन्मीची =ेव । भेटले आम्हा गुरूदेव । अनमोल त्यांचे बोल । कानी पडती समयोचित । ।29 । । येतासमय जवळी । मार्गदर्शन गुरू करी । भक्तचिंता दुरवरी । अनेक मार्गे होत असे । ।30 । । गुरू रामचंद्र सरस्वती ।निजभक्ता सांभाळिती । वेळोवेळी उपदेशिती । संदेश प्रति गुरूवारी । ।31 । । संदेश जे का अनमोल । भक्तहदयीसखोल । अमृतवचन शीतल । किर्ती राहे त्रिकाळ । ।32 । । ते निनाद स्वर । नित्य स्मरावे निरंतर । व्हाल तुम्ही भवपार । नि :संशय भूवर । ।33 । । गुरूसेवेचे अनुमान । गुरूच करिती जाण । सेवा करून आज्ञापालन । सत्य भक्ताठयी असे । ।34 । । सात्विक भाव देई । जन्मोजन्मीची पुण्याई । गुरूभेटी होता जिवी । उध्दारगति होत असे । ।35 । । पूर्वसुकृतेकरून । संतसंगतिकारण । सन्मार्ग दर्शन । सहजगतीगुरूकृपे । ।36 । ।गुरूकृपाहोतानरा ।अमृतकृपेचा झरा । अखंडवाहे भराभरा । तृप्त करी भक्तांते । ।37 । । जयजय गुरूदेव । तूच आधार ऐकमेव । कैवल्याची =ेव । गुरूचरण सेवेतचि । ।38 । । हया अवतारी अनंतलीला । नित्य पाहती भक्त डोळा । अंतर्यामी जीवाला । नित्य सुख वाटतसे । ।39 । ।परममंगल गुरूदेवा । नित्य घडो चरणसेवा ।तव नामाचा विसर न व्हावा । नि:स्वार्थ सेवा घडावी । ।40 । । दत्तात्रयांचेरूप । दिव्य ते दृष्टिसुख । नयन दिपती देख । तेजोमय प्रकाशाने । ।41 । । परममंगल सद्गुरू । दीन अनाथा आधारू ।भवसागर पार करू । गुरूचरण नौकेवरी । ।42 । । सद्गुरू श्रीरामचंद्र । करूणा संथ समुद्र । पौर्णिमेचा शीतल चंद्र । शांतीदेई भक्तांते । ।43 । । अज्ञ तिमिर जीवनात । नाही राहत यत्किचिंत । स्वयम्प्रकाशतोश्रीगुरूदत्त ।नित्यदेतशरणांगता । ।44 । ।शरणांगतीचा मार्ग । नसावा स्वाभिमानगव ।नित्यअसावेनम्र ।श्रीसद्गुरूंचेचरणी । ।45 । ।श्रीगुरूचरणांचे रज ।तोचिआमुचाअलंकारसाज ।भूषवीलजीवनास ।भक्तिभावेलाविता । ।48 । ।अनमोलश्रीगुरूचरण । श्रध्दाभावे पूजन । भवसिंधू तरून । सहज जीवन तरेल । ।49 । । लहानाहुनी लहान । नित्य असावेनम्रपणे । सदा घ्यावे गुरूनाम । शरणांगतीने रहावे । ।50 । । गुरूदेव त्रयमुर्ति । सर्वजगाचा अधिपती । विश्वव्यापकआदिशक्ति । सर्वाधार चराचर । ।51 । । सबाहय अभ्यंतरी देखा । गुरूसारीखा पाठठ्ठराखा । शरणांगत भक्तसखा ।उपभोगी आत्मसखा । ।52 । ।आत्मांनंद मिळता । जीव तो उपभोगिता । भावपूर्ण चित्ता ।भान न राहे जगताचे । ।53 । ।गुरूदेव प्रसवीसमुर्ति । जागृतअसतीजगती ।त्रिकालज्ञाुरूमुतिजगचालकपरमात्माा । ।54 । ।यापुढीलअध्यायी ।गुरूवचनामृत जे काही । श्रवणी पडती लवलाही । परिसावे श्रोते सृजन हो । ।55 । । । ।42 । ।इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड ।त्रिचत्वरिंशाा ध्याय गोड हा । ।43 । ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |