श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 29 वा ॥
। श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।त्रयमुर्ति सगुण । त्रिगुणात्मक निर्गुणा । साकार तू सर्वेश्वरा॥1॥ हया अवतारी रामचंद्र । सगुणरूप परब्रम्ह । गुप्तरूपे यथासांग । भक्तरक्षण करीतसे ॥2॥ कलियुगी अनाचार ।दुर्वासना अनिष्ट प्रकार । होत असे भूमिभार । अनिती भ्रष्टाचार ॥3॥ प्रेरणा होई सद्गुरू शी । श्रीरामचंद्र यतिराशा ।अगाध तयाची किमया । स्वये स्वयंभू प्रभूराया ॥4॥ ज्याचे चित्त गुरूचरणी । स्थिरावले बा सगुणी । त्या नरासी हयाजन्मी । सद्गति प्राप्त होय ॥5॥ पाहूनि अंतरीचा भाव । पावत असे गुरूराव । घेऊनी पदरी गुरूदेव । प्रतिपाळी गुप्तरूपे ॥6॥ रामराया जगत्पाला । अनेक तुझ्या सगुणलीला । अंत नसे बा तयाला । कैसे मानवी जाणावे ॥7॥ गुरूभक्तिचे कवच । मानवा रक्षीरात्रंदिवस । अनेक आपत्ती व्याधीस । परतून लावी तत्काळ ॥8॥ ऐसे गुरूकृपेचे महिमान । अज्ञ मानवा न कळे जाण । त्यातुनि कलियुगी मानवा ।धर्मप्रेम मुळी नसे ॥9॥ अहो श्रोते तुम्ही सुजन ।खचित आहात भायवान । गुरू दत्तात्रय रूप सगुण । स्वयेंच स्वधर्मा शिकविता ॥10॥ त्रैलोक्याधीश जगत्पिता ।जागृत जनकल्याणार्था । यज्ञयाग जपयथार्थ । करिताती ते ऐका ॥11॥ पूर्वकाली थोर ॠषि । राजे महाराजे महर्षि ।इष्ट देवता तुष्ट विण्यासी । यज्ञयाग करिती पहा ॥12॥ तैसे येथे कलियुगी । गुप्तरूप दत्तयोगी । साक्षात त्रिभुवनी त्रयमुर्ति । जनकल्याण जागृत हो ॥13॥ सकल जनांच्चा कल्याणा । सद्बुध्दी देई सृजना । सत्कार्य पूर्ण होण्या ।संदेश देती सद्गुरू ॥14॥ दत्तनामाचा जप सव्वाकोटी । करोनिया जनलोकी । प्रस्थापिण्या जनशांती । दिगंतरसुखप्राप्ती ॥15॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा । हा मंत्र थोर ।कणाधूरसुस्वर।दुमदूमितअवनीवर।परमपवित्रथोरहा॥16॥महामंत्राचे उच्चार । प्रतिक्रिया निरंतर । घुमताती सत्वर । संस्कार मानवी जीवावर ॥17॥नाद दिगंबर दिगंबर । कर्णमधुर सुस्वर । भूलोकी पवित्र थोर । मंत्रगजर भक्त करिती ॥18॥ त्या प्रभावेकरून । शक्तितेथे जागृत होऊन । त्या परिसरी वास्तव्य जाण । त्रयमुर्ति करीत असे ॥19॥ गुरूदत्तात्रय भगवान । त्रिभुवनी भ्रमणकरूनी । पुज्ज पवित्र वसतिस्थान । औदूंबर कल्पवृक्ष ॥20॥ अंतरमनाची पूर्ण स्थिती । तेथे जागृतता निश्चिती ।दत्तकृपेची महति । अनुभवेच जाणावी ॥21॥ मानवाचे अंतिमरूप । अनीचे असे जाणसत्य।म्हणूनअनीदेवतेस ।महत्व असे यायचे ॥22॥अनीदेवता भूवरी । साक्षात जागृत परमेश्वरी । जगन्माता भुवनेश्वरी ।साक्षात स्वरूप प्रकटतेथे ॥23॥ स्वाहाकार रूपे त्यासी । आहूती अर्पूनी प्रितीशी । प्रसवीस देवता भक्तासी । आशिर्वच शुभ देई ॥24॥सगुण माझे दत्तराजा । नित्य झटती भक्तकाजा । अविकार टविनाश । सर्वेश्वर जगवीसाथ ॥25॥ त्साशी कारावयाप्रसवीस । जगती अनेक उपासना । त्यापैकी यज्ञयाग कर्मा । आद्यस्थान असे हो ॥26॥ अनी प्रज्वलीत साक्षात ।गुप्तरूपे दत्त तेथे । स्वा:हाकार रूपे तृप्त होत । यज्ञयाग कर्ममार्ग ॥27॥ स्वतेज हे अनीरूप । प्रकटता साक्षात ।नयनदिपती तेज झळाळत ।धन्य वाटे जीवनी ॥28॥ या नरदेहाचे सार्थक । प्रत्यक्ष गुरूसेवेत । गुरू सेवा व्रतजीवनात । खचित रक्षिते मानवा ॥ 29॥ मानवजीवनी गुप्त खचित । शाश्वतरूप गुरूदत्त । जगता सांभळी नित्य ।श्रीरामचंद्र कृपाळा ॥30॥ जय जय करूणाधना दयाळा । परमकृपाळू स्नेहाळा । सजीव निर्जीव प्रतिपाळा । अगम्य तुझी करणी असे ॥31॥ दिनानाथा परमकृपाळा ।गुरूदत्ता स्नेहाळा । परमसुख शांतीदाता ।तुचितारकवेल्हाळा ॥32॥ यज्ञयागधमक । पूवकाळीसुगम ।कालगतीप्रमाणे धर्मनिती बदलली ॥33॥ प्रार्थना तुज हात जोडोनी।अनन्यभावे गुरूचरणी । दाखवी नाथ रूप सगुणी । परमकृपाळू स्नेहाळा ॥34॥ रामचंद्राकृपासमुद्रा।दयावंताकरूणासागरा।भक्तरक्षण्या घे अवतारा । कलियूगी गुरूराज ॥35॥ श्रीरामचंद्रा गुरूराया । भवतारका भक्तकाजा ।सदैव जागृत राहूनि आज । स्वांगे झटशी नित्य तू ॥36॥ पूर्णाहूति पूर्ण होता । पूर्णारती बोलविता । वेदघोष गर्जता ।अत्यानंद देवतेस ॥37॥ पूर्णस्वरूप पूर्णब्रम्ह । यति रामचंद्र सगुण । श्रीपादश्रीवल्लभ निर्गुण । रूप साकार प्रकटले ॥38॥ साक्षातरूप सर्वेश्वरा। दिगंबरा जगदोध्दारा । अवतरला भक्तोध्दारा । अवनीवरी साक्षात ॥39॥ साक्षातरूप सर्वेश्वरा । दिगंबरा जगदोध्दारा । तुझ्या लीला वर्णनाला । अधिकार पाहिजे पूर्वापार ॥40॥ हेचि मागणे गुरूदेवा । गुरूचरणी दृढ भाव। अखंडीत गुरूसेवा । या जीवे घडावी ॥41॥ गुरूदेवा मायबापा । योयमार्ग दावी आता । तूच अंती शांतिदाता । परमकृपाळू दयाळा॥42॥इतिश्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड । एकोनत्रिंशा ध्याय गोड हा ॥36 ॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |