श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

तीर्थयात्रा व अनुभूति

 

श्री क्षेत्र रिध्दपूर यात्रा 

रिध्दपूर यात्रेचा विचार बरेच दिवसाचा होता.  पण कांहीना कांही कारणाने कल्पना साकार रूप घेत नव्हती. यज्ञ झाला त्याच वेळी निघायचेच होते पण योग नव्हता. खर म्हणजे महाराजांचे चरणीचे सेवा पूर्ण झाली नव्हती म्हणूनच त्याचे तिथे पोचायला परवानगी दिली नसेल काय? प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो म्हणतात ना! मग हया यात्रेला तरी त्या मुहूर्ताशिवाय महाराजांनी परवानगी कां द्यावी? दुसरं म्हणजे ही कांही पदयात्रा नव्हती. त्यामुळे निघायला आवश्यक असलेली तयारी महाराजांनी आधी करून घेतली असेलच मगच श्री वैद्यराज मुळे यांना निमित्त मात्र दिसायला महाराजांनी अकोल्यास पाठवलं दुसरे वैद्यराज श्री रंगनाथराव मुळे आले. अलभ्य लाभ झाला! पण या वेळचं श्री मुळ च येणं नेहमी सारखं वाटलं नाही. कांही तरी निश्चयान ते आले आहेत असं वाटत होतं, आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी सरळच प्रश्न केला '' बरीच वाट पाहिली पण आपलं येणं का, झालं नाही? '' ''यायचं आहे! जमलं की येतोच'' म्हणून उत्तर दिलं. पण त्यांच समाधान झाल नाही. ''आता यायलाच पाहिजे, टाळाटाळ करू नका'' पुन्हा श्री मुळे उदगारले! आणि आता चलाच म्हणून आग्रहयुक्त अधिकाराने त्यांनी सांगितले. त्यांनी हे वाक्य उच्चारलं आणि मनानी उचल खाल्ली की चला, गेलचं पाहिजे. कदाचित तया ठिकाणचं दर्शन घेण्याकरता आवश्यक असलेली पात्रता आता पूर्ण झाली आहे अस स्वामींना वाटलं असेल म्हणूनच सर्व गोष्टीची सिध्दता महाराजांनी घरात करून घेऊनच मनाची उत्सुकता वाढविली ही गोष्ट निश्चित!
सोमवार दि 1 ऑगस्ट 1975 ! पुन्हा श्री मुळे भेटले आणि पुन्हा तोच प्रश्न. मग कधी निघणार? हे वाक्य एैकलं आणि मनानी पक्की उचल खाल्ली की जायचंच! श्री आप्पासाहेब शहाण ना बोलावून आणल.ं आणि बेत निश्चित केल शुक्रवार दि. 15 ऑगस्ट ला निघायचं, शनिवारची सुट्टी घ्यायची आणि रविवारी परत यायचं. रिध्दपूर रूपी गाणगापूर यात्राच ती; त्याची बातमी गुप्त कशी राहील? कर्णोपकर्णी, बरीच वाच्यता आणि यात्रेचा योग या यामुळे ज्यांना ज्यांना ही गोष्ट कळली ती मंडळी कार्यक्रमाची आखणी करण्यांत गुंग झाली. सगळयांनी तयारी केली युक्रवार केव्हा उजाडतो याची प्रत्येक जण वाट पाहू लागला. महाराजांच्या दरबारी जायचं आणि होईल ती त्यांची सेवा करण्याची संधी साधायची म्हणून साखळी पारायण करायचं ठरविलं त्या अनुषंगानेही तयारी करून घेतली. महाराजांच्या दर्शनाला जायचं त्यामुळे लहाण मोठयांची भूक तहान हरवून गेली होती. गाडी येते केव्हा आणि सुटते केव्हा याची प्रत्येक जग वाट पहात होता. गाढी तिच्या वेळेवरच आली आणि सुटली. गाडी सुअल्यावर खरच किती जणांना दर्शनाची ओढ लागली होती याची मोजदाद केली. आम्ही सारे लहान मोठे 35 जण होतो. प्रत्येक जण प्रवासाच्या आणि रिध्दपूर क्षेत्रातील वातावरणाच्या विचारात रंगून गेलेला दिसला कारण प्रत्येकाच्या बोलण्यात विषय भरलेला होता. श्री महाराजांच्या दर्शनाचा!

श्री जगन्माता एकविरा देविची अमरपूर (अमरावती) आली. स्टेशन बाहेर श्री मुळे पुन्हा दत्त म्हणून स्वागतास तयारच! बस स्थानक गाठलं. चांदूर बाजाराचा रस्ता भरधाव वेगाने मागे टाकत मोटार धावत होती. अवघ्या उक तासात चांदूर बाजार गाठलं. रिध्दपूर मोटारला तास दीड तास होता. याचा विचार मनात येतो न येतो तोच एक ट्रक समोर उभा झाला. त्याचा ड्रायव्हर रितपूर - रितपूर म्हणून ओरडू लागला. अंतरीची मनाची ओढ जबर त्यामुळे त्या ट्रकची चोकशी करून सर्वजण आनंदाने ट्रकमध्ये विराजमान झाले. अगदी थोडया वेळात तयाचे श्री क्षेत रिध्दपूरच्या परिसरात प्रवेश केला आणि थेट श्री भाऊसाहेब देशपांडे यांच्या वाडयापर्यंत नेऊन सोडले. जुन्या पध्दतीचा मोठा वाडा. आजू बाजूला थोडी मोकळी जागा, थोडा रस्ता ओलांडून मोठया दरवाजातून आंत प्रवेश केला आणि आपण महाराजांचे चरणी येऊन पोचलो याचा आनंद ओसंडू लागला. सामानाची व्यवस्था केली आणि समोरच बसलेल्या सात्विक भाव असलेल्या धीर गंभीर श्री भाऊसाहेब देशपांडे यांना नमस्कार करून आम्ही अकोला निवासी आहोत याची वर्णी दिली व हातपाय धुवून सर्वजण दर्शनाचे स्थान शोधू लागलो.
श्री मुळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे प्रथम श्री भाऊसाहेब देशपांडे यांचे घरातील नवीन बांधलेल्या देवघरात जावून श्री गजानन महाराज, श्री नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज व श्री रेणुका व श्री नेरपींगळाई येथील स्थान असलेल्या पण रेणुका मातेच्या सोबत बसलेल्या श्री पिंगळामाता यांचे दर्शन घेतले. अर्थात ती प्रथम वेळ व नवीन स्थे, पवित्र वातावरण, याचे मनातील उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट भक्ति भावाने पाहिल्या जात होती. देवघरातून निघून चौकाच्या बाजूच्या ओसरीतून मागील अंगणाकडे कल्पवृक्षाकडे जाण्याचा मार्ग, ठेंगणे असलेल्या दरवाजांनी जोडला आहे त्यामुळे अर्थातच पवित्र वृक्षाकडे जातांना नतमस्तकचं होऊनच जावे लागते. कारण ती योजना नसती तर नास्तिक माणूस मान ताठ करूनच त्या थोर वृक्षाकडे चिकित्सक वृत्तीने गेला असता. पण कशाही प्रवृत्तीचा जीव तेथे गेला तर त्या नितांत वास्तव्य असलेल्या स्वामीनृसिंहसरस्वती स्वामींच्या आवडत्या वृक्षाकडे त्याने नतमस्तक होऊनचं गेलं पाहिजे अशीच त्या विधात्याची आज्ञा असावी. म्हणून त्याच पध्दतीने त्या द्वाराची रचना केली असावी. त्या जागेतून गेल्यानंतर मागच्या अंगणात पवित्र वृक्ष दृष्टीस पडला.

 


 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org