श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org
मुख्य पृष्ट श्री रामदत्तगुरु चरित्र आरती नमन अष्टक अनुभव जे जाणति तीर्थयात्रा व अनुभूति कर्दळिबन चित्र दालन पत्र संवाद
Untitled Document

रामभाऊंना चित्रकलेची आवड आहे म्हणजे त्यांना सर्व काही येते असा समज इतरांनी करून घेतला असावा. एकदा शेजारच्या सौ.नातू वहिनींनी त्यांना कणक ीचा लक्ष्मीचा पुतळा करून देण्याची विनंती केली. असा मुखवटा रामभाऊंनी पूर्वी कधी बनविला नव्हता. रामभाऊंनी पुतळा बनविला आणि पूजेसाठी तो मांडण्यात आला. असा इतका सुंदर पुतळा लोकांच्या पाहण्यात पूर्वी कधी आला नव्हता. एवढेच नव्हे तर त्या पुतळया मध्ये जिवंतपणाची जाणीव झाल्यासारखी पाहर्णायांना वाटू लागली. तो पुतळा पाहण्यासाठी स्त्रिपुरूषांनी एकच गर्दी केली होती. पुढे बरीच वर्षे रामभाऊ सौ.नातू वहिनींना कणकीचा पुतळा करून देत असत. या चमत्कारिक कला गुणांचा वारसा रामभाऊंना आमच्या मातोश्री सौ.सरस्वतीबाई आणि पिताश्री श्री नारायणराव बापू यांच्या कडून मिळालेला आहे. ते दोघेही महान कलाकार होते. तो संपूर्ण इतिहस खूपच मोठा आहे. म्हणून तो सविस्तर लिहिण्याचा मोह मी टाळत आहे.

श्री रामभाऊ जादूगार आहेत. मोठमोठे जादूचे प्रयोग त्यांनी अनेक ठिकाणी केलेले आहेत. ते नट आहेत. दिग्दर्शक आहेत मेकअप करण्यामध्ये खूपच प्रविण आहेत त्यांची अनेक नाटके विदर्भात आणि मुंबईला झाली आहेत. रामभाऊ हे असं बहुगणी व्यतिमत्व आहे. त्यांच्या बद्दल लिहावं तेवढ कमीच होईल. आज आपणा सर्वांना श्रीरामदत्त महाराज म्हणून परिचित असलेलेशेकडो हजारो दत्त भतांचे श्रध्दा स्थान असलेले श्रीरामभाऊ यांची पूर्व पीठिका कशी आहे हे सर्व भतांना चांगले कळावे म्हणून एवढया विस्ताराने लिहिले आहे.

 

 

मागील पान           पुढील पान

 

श्री रामदत्तगुरु चरित्र.....Http://ramdattaguru.org