श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 6 वा ॥
॥ श्री गणेशाय नम :॥ श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरूभ्यो नम: । मंगलमुर्ति मोरया । वंदन तुम्हा करीते सदया । विद्यावाचस्पती गणराया । वक्रतुंडनमन तुम्हां ॥ 1 ॥ जय जय श्री सद्गुरूनाथा । अत्रितनया अवधुता । त्रयमुर्ति सगुणस्वरूपा । शरण तुम्हां त्रिवार ॥2 ॥ अखंड ध्यास गुरूभक्तिचा । संतसहवास जीवनी साचा । मार्ग मिळण्या जीवनमुक्तिचा । गुरूभक्ति श्रेष्= असे ॥3 ॥ गुप्त अवतार त्रयमुर्तिचा । अमुल्य =ेवा कलियुगी साचा । हा कल्पतरू शांतवी भता । नरजन्मा येऊनी ॥ 4 ॥ दोन तपे लोट ली । परी ओळख ना पटली । गणगोता भांत्र पडली । अतुल करणी ब्रम्हयाची ॥ 5 ॥ चमत्कार लीला अगणित । बालपणी घडल्या किती एक । मानवप्राणी निद्रीस्त । जागृती नसे जीवनी ॥ 6 ॥ कैसा असे योगायोग । विधिसुत्रॠणानुबंध । घडला असे एक प्रसंग । खामगांवी असता व्रतबंध ॥ 7 ॥ होते बापु कुलोपाध्याय । व्रतबंधन विधी करिता सोय । अधिक न्युन विधित होय । प्रायश्चित मिळे मुळेंना ॥ 8 ॥ होमालागी लावी मृत्तिका । वृश्चिकदंश झाला देखा । कुलोपाध्याय हा हा म्हणता । हिंडु लागले भुमिवर ॥ 9 ॥ होता व्रतबंध त्रयमुर्तिचा । परी कोणा नसे सुगावा त्याचा । अज्ञानी मानवाचा । र् हास होतो जीवनी ॥ 10 ॥ व्रतबंध विधी होता । ब्रम्हचर्याश्रमाची योग्यता । अवतारकार्य करण्याकरिता । हा योग्य काळ असे ॥ 11 ॥ चातुर्मासाचे प्रारंभात । एकोणाविसशे छप्पवीसात । रामपदार्पण अकोल्यात । प्रारंभ होई जनकार्या ॥ 12 ॥ अकोला ग्रामाभितरी । आले फडणिसांचे घरी । वडिल राहीले पांगरी ग्रामी । माता भगिनी जवळ असती ॥ 13 ॥ अकोला ग्रामी होता स्थिर । घडला पुढे चमत्कार । श्रवण करिता उध्दार । कलीयुगामाझारी ॥ 14 ॥ मातेसह दोन भगिनी । आनंदे राहती रामसदनी । वडिल राहती पांगरीग्रामी । वतनदारी कार्य करण्या ॥ 15 ॥ येथे कैसे नवल घडले । विधीसुत्र कोणा न कळले । रामशरीर क्षीण झाले । माता चिंता करीतसे ॥ 16 ॥ उपाय योजिला गुरूंनी । राहीले गोमुत्र प्राशुनी । दोन महिने याच त र् हेने । काळ क्रमिला रामराये ॥ 17 ॥ उठेन रोज प्रात र् काळी । गोमुत्र प्राशन मन निर्मळी । देहशुध्दि करूनी । अवतार कार्य करण्या सिध्द ॥ 18 ॥ स्वामी नृसिंह सरस्वती । भगवी वस्त्रे भगवी छाटी । अखंड भ्रमण भूवरी । जागृत असती निरंतर ॥ 19 ॥
तीन रात्री नवल घडले । स्वामीदर्शन रामासी झाले । प्रत्यक्ष स्वामी ठकले । जागृत करीती रामास ॥ 20 ॥ पूर्वसुकृत दिव्यह्ष्टी । गुरूदर्शनी होई तृप्ती । रामगुरूसी येई प्रचिती । अवर्णनीय शब्दातीत ॥ 21 ॥ पायी खडावा अनुपम असती । दैदिप्यमान सगुणमुर्ति । मध्यरात्री प्रकटती । त्रैमूर्ति रामापुढे ॥ 22 ॥ प्रथमदिनी नेत्र दिपले । रामअंतरी गडबडले । स्वामींनीही अभय दिले । वरदहस्त =ेवोनी ॥ 23 ॥ ब्रम्हांडाचे स्तर समस्त । उपदेशिती सद्गुरूनाथ । रामगुरू होती लीन । पदकमळी स्वामींच्या ॥24 ॥ मध्यरात्री शांतवेळी । कोणासवे राम बोलती । माता मनी चिंतावली । रामगुरूसी पुसतसे ॥25 ॥ राम सांगती जननीसी । सद्गुरू आले भेटीसी । पुर्णकृपा करण्यासी । हृदयी आपूल्या आलिंगीले ॥26 ॥ नियमाने रात्री तीन । सद्गुरूंनी दिले दर्शन । पुढे करावे कार्य अपूर्ण । स्वामी म्हणती रामचंद्रा ॥27 ॥ पूढे कैसे नवल घडले । रामचंद्र चित्ती रंगले । दिगंबर चिंतनी निमग्न झाले । समाधी सुखे डोलती ॥28 ॥ ब्रम्हरस अखंड प्याले । अंतरी बहु तृप्त झाले । आपपर भाव निमाले । कार्य करण्या सिध्द होत ॥29 ॥ मातेसी वदती राम । करू गुरूचरित्र पारायण । त्वा अशिर्वाद करूनी । आज्ञा द्यावी सत्वरी ॥ 30 ॥ माता वदे ऐक रामा । करू नये कठठ्ठण कामा । गुरूचरित्र व्रतनियमा । पालन कैसे होईल ॥ 31 ॥ परी इच्छा देखुनी रामाची । दिली अनूमती वाचावयाची । मनीमानसी मोहरली साची । वृत्ती रामगुरूंची ॥ 32 ॥ येता जैसे दिवस जवळी । राम स्वानंदे डोलती । दत्त दिगंबर चिंतनी । चित्त रंगले रामाचे ॥ 33 ॥ आणिला फोटो त्रयमूर्तिचा । लाविला वृक्ष औदुंबराचा । ग्रंथ आणुनि शेजारचा । तयारी सदनी केली असे ॥34 ॥ मंगळवारी शुभदिनी । प्रात र् काळी उठेनी । अतिहर्षे राम मनी । प्रारंभ केला पारायणी ॥ 35 ॥ सप्ताह वाचता सदनी । आनंदी आनंद होत भूवनी । माता बैसोनी श्रवणी । सद्गदीत होत असे ॥ 36 ॥ यापूढील चमत्कार । कैसा घडला साक्षात्कार । ऐका तुम्ही श्रोते चतुर । कलियुगी धन्य अवतारी ॥ 37 ॥ इति श्रीरामगुरू चरित्र । परिसा रसाळ इक्षूदंड । विनवी दासी अखंड । षष्ठेध्याय गोड हा ॥38 ॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |